आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीयनेत्यांचे स्वागत, निवडणूक अथवा वाढदिवस शुभेच्छांचे भलेमोठे फलक लावून शहरातील मोक्याच्या जागा अडवणारे भाऊ, दादा, अप्पा मंगळवारी जमिनीवर उतरले.

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राजकीयनेत्यांचे स्वागत, निवडणूक अथवा वाढदिवस शुभेच्छांचे भलेमोठे फलक लावून शहरातील मोक्याच्या जागा अडवणारे भाऊ, दादा, अप्पा मंगळवारी जमिनीवर उतरले. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर महापालिकेने मंगळवारी धडक कारवाई करून शहरातील १७० बेकायदेशीर होर्डिंग्ज काढले. राजकीय पक्ष, गल्लीतील नेत्यांसोबतच शासकीय योजनांचे फलकही पालिकेने काढले.
राज्यातील विविध शहरांमध्ये असलेले बेकायदेशीर होर्डिंग्ज तत्काळ काढण्याचे आदेश सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. तसेच या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी झाल्यास संबंधित महापालिका नगरपालिकांना बरखास्त करण्यात येईल, अशी तंबीही न्यायालयाने दिली होती. न्यायालयाच्या तंबीचा तत्काळ परिणाम मंगळवारी जळगावात दिसून आला. त्यानुसार मंगळवारी शहरातील राजकीय पक्ष नेत्यांच्या विनापरवानगीने लावलेले हाेर्डिंग्ज जप्त करण्याची मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेत दुपारपर्यंत 170 अनधिकृत होर्डिंग्ज जप्त केले. मात्र, अजूनही अनधिकृत होर्डिंग्जची संख्या माेठी अाहे.

अनधिकृत हाेर्डिंग्ज लावण्याविरोधात जनहित याचिका (क्र.१५५-२०११) दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने प्रत्येक हाेर्डिंगला परवानगी देताना त्यावर आवश्यक माहिती टाकण्याचे निर्देश दिले होते. ही माहिती नसलेले होर्डिंग्ज अनधिकृत मानले जाऊन तातडीने काढण्याचे निर्देशही दिले होते. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची घोषणा पालिकेने केली होती. त्यानुसार शहरात मंगळवारी महापालिकेने कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. या कारवाईत सातत्य रहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ही सक्ती नावालाच
बॅनरलापरवानगी दिल्याचा क्रमांक तारीख
होर्डिंग किती दिवस राहणार, याचा कालावधी
बॅनरचे मंजूर ठिकाण
फलकाचा आकार
कारवाईत सातत्य राहणार
होर्डिंग्जचीप्रिंटिंग करतानाच त्यावर परवानगी, कालावधी, स्थळ आदीउ बाबींचा समावेश असणे बंधनकारक आहे. परवानगी असली, परंतु या बाबी नसलेल्यांचे फलकही यापुढे जप्त करण्यात येतील. प्रदीपजगताप, प्रभारीअपर आयुक्त