आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-शिवसेना युतीसाठी प्रतीक्षा अादेशाची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवळाली कँम्प - भगूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शनिवारी (दि. २९) अंतिम मुदत आहे. शिवसेना आणि भाजपने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी युतीची घोषणा केली आहे. त्यामुळे भगूरमधील स्थानिक पदाधिकारी इच्छुकांचे लक्ष वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे लागले अाहे. गुरुवारी नगरसेवकपदासाठी इच्छुक १९ तर नगराध्यक्षपदासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला.
नागरिकांमधून थेट नगराध्यक्ष निवडून जाणार असल्याने भगूरमध्ये युती झाली तर भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी अडीच वर्षे सत्ता मिळेल. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युतीला नकार दिला तर शिवसेना बाजी मारण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारी डमी अर्ज दिले असले तरी पक्षाचा एबी फाॅर्म कोणाला मिळतो याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
शिवसेनेच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती घेऊन अर्ज दाखल करण्याचे सूचित केले असले तरी एबी फाॅर्म दिले नसल्याने त्यांच्या मनात अजूनही भीती कायम आहे. शिवसेनेकडून अनिता करंजकर यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी निश्चित असून, त्यांनी शुक्रवारी अर्जही दाखल केला अाहे. शनिवारी धामधुमीत अंतिम अर्ज देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे नगराध्यक्षपदासाठी प्रेरणा बलकवडे यांचा अर्ज दोन दिवसांपूर्वीच दाखल झाला आहे. राज्यात शिवसेना-भाजप युती करण्याचे आदेश दोन्ही पक्षांकडून दिले असले तरी भगूरमध्ये युती होण्याची शक्यता कमी आहे. यापूर्वीही युती होती तेव्हाही भगूरमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढविली गेली होती. तर भाजप शुक्रवारी नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करणार होते. यासाठी आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, सचिन ठाकरे, दिनकर आढाव, तानाजी करंजकर आदी उपस्थित होते. मात्र, नगराध्यक्षपदासाठी शोभा भागवत आणि मीना आडके यापैकी एकाही उमेदवाराचे नाव निश्चित झाले नाही. त्यामुळे शनिवारी सर्व अर्ज दाखल करण्यात येणार आहे. नगरसेवक पदासाठी इच्छुकांमधील शांताराम शेटे, फरीद शेख, भाऊसाहेब गायकवाड, सुवर्णा पगारे, प्रसाद आडके, सुनील जाधव, संग्राम करंजकर, मधुकर कापसे, सुरेश वालझाडे, किशोर कुंडारिया, मोहनी वालझाडे, प्रियांका पवार, मनीषा कस्तुरे, दत्तात्रय कुंवर, सतीश शिरसाठ, विलास कुलकर्णी, अजय लोट, प्रतिभा घुमरे, अनिता ढगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

पक्षश्रेष्ठींचा अादेश पाळणार
^पक्षश्रेष्ठींचा आदेश आम्हाला शिरसावंद्य असून आम्ही आदेशाची प्रतीक्षा करीत आहाेत. त्यानंतर युतीबाबत निर्णय घेण्यात येईल. - विजय करंजकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना
बातम्या आणखी आहेत...