आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Elections Of Women And Child Welfare Committee Chairman

‘महिला बालकल्याण’च्या निवडीत काँग्रेसचे पुनर्वसन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापाैर निवडणुकीत माेठी फाटाफूट हाेण्याची भीती असताना काँग्रेसने मनसेला उघडपणे समर्थन दिल्यानंतर सातत्याने हाेणारी फरफट अाता महिला बालकल्याण समिती सभापती निवडणुकीच्या निमित्ताने थांबण्याचे चित्र असून, या निवडणुकीत काँग्रेसला सभापतिपद, तर मनसेने उपसभापतिपद घेऊन दिलासा दिला अाहे. यापूर्वी राष्ट्रवादी अपक्षांना झुकते माप दिल्यामुळे काँग्रेसकडून वेळाेवेळी नाराजी व्यक्त झाली हाेती.

महिला बालकल्याण सभापती, उपसभापतीची २१ अाॅक्टाेबरला निवडणूक असून, अर्ज दाखल करण्याची साेमवारची मुदत हाेती. काँग्रेसच्या वत्सला खैरे, तर मनसेकडून शीतल भामरे यांनी अर्ज दाखल केले. मूळ माकपच्या, परंतु अलीकडेच शिवसेनेच्या काेट्यातून अालेल्या नंदिनी जाधव यांनीही अर्ज केला अाहे. बालकल्याण समितीचे संख्याबळ इतके असून, विजयासाठी मनसे ३, राष्ट्रवादी, काँग्रेस असे पुरेसे संख्याबळ अाहे.

या पार्श्वभूमीवर खैरे यांच्या सभापतिपदाचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र अाहे. साधारण वर्षभरापूर्वी मनसेला महापाैरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने समर्थन दिले हाेते. त्यानंतर थेट सत्तेत सहभाग काँग्रेसला दिला गेला नाही. अपक्षांकडे उपमहापाैरपद, तर राष्ट्रवादीकडे स्थायी समिती दिली. त्यानंतर शिक्षण समिती सभापतिपदही अपक्षांनाच दिले गेले, तर राष्ट्रवादीने महिला बालकल्याण सभापतिपद अापल्याकडे ठेवले हाेते. प्रभाग समिती निवडणुकीत मनसेतील अंतर्गत वादामुळे काँग्रेसला अालेले पश्चिम प्रभाग समिती सभापतिपद मनसेकडे गेले. या पार्श्वभूमीवर महिला बालकल्याण समिती सभापतीच्या निमित्ताने काँग्रेसने पुनर्वसन झाल्याचे चित्र अाहे.

खैरे यांचा मार्ग सुकर
येत्या २१ अाॅक्टाेबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून वत्सला खैरे यांनी अर्ज दाखल केला आहे. महिला बालकल्याण समितीचे संख्याबळ नऊ इतके असून, विजयासाठी मनसेचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि काँग्रेसचे एक असे पुरेसे संख्याबळ त्यांच्यासाठी अाहे.