आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांना वीजदरवाढीचा २०-२० दणका, उद्याेजक तीव्र अांदाेलनाच्या पवित्र्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यशासनाने वीज क्षेत्रात दिली जाणारी ७०६ काेटी रुपयांची सबसिडी बंद केल्याने नाेव्हेंबर महिन्याच्या बिलातच घरगुती, व्यापारी अाणि अाैद्याेगिक वीजग्राहकांना २० ते २२ टक्के दरवाढीचा दणका बसला अाहे. तसेच, महानिर्मितीने २६१५ काेटींच्या तुटीपायी केलेली जादा दराची मागणी अाणि त्यावर महावितरणकडून हाेणारी संभाव्य मागणी पाहता येत्या मार्च महिन्यापर्यंत पुन्हा सुमारे २० टक्के दरवाढ ग्राहकांच्या माथी मारली जाण्याची चिन्हे अाहेत. या दरवाढीमुळे उद्याेजक संघटना तीव्र अांदाेलनाच्या पवित्र्यात अाहेत.
दाेन दिवसांपासून वीजबिले घराेघरी पाेहाेचल्यानंतरच या दरवाढीचा दणका ग्राहकांना बसल्याचे लक्षात अाल्याने नागरिकांचा संताप झाला अाहे. नाेव्हेंबर महिन्याच्या बिलांचे वितरण सुरू झाल्यानंतर नेहमीइतकाच वीजवापर करूनही वीजबिलात माेठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांनी कटू शब्दात राज्य शासनावर ताशेरे अाेढले अाहेत.

सामान्य ग्राहकांना सध्या १०० युनिटपर्यंत रुपये १६ पैसे तर १०० ते ३०० युनिट वापरणाऱ्यांसाठी ७रुपये ३९ पैसे प्रतियुनिट दर हाेता. मात्र, त्यात अाता नाेव्हेबरच्या बिलापासून १०० युनिटपर्यंत ८० पैसे ते १३४ पैसे प्रतियुनिट दरवाढ तर जे ग्राहक १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीजवापर करतात त्यांना प्रतियुनिट १३४ पैसे दरवाढीचा दणका नाेव्हेंबरच्या वीजबिलातच साेसावा लागला अाहे.
व्यापारी उद्याेजकांना शाॅक
व्यापारीस्वरूपातील अास्थापना असलेल्या ग्राहकांना वापराप्रमाणे १४५ पैसे ते २५८ पैसे (दीड ते अडीच रुपये) प्रतियुनिट वाढ सहन करावी लागली अाहे. अाैद्याेगिक ग्राहक लघुदाब उद्याेग २७ हाॅर्सपाॅवरच्या अातील १०९ पैसे प्रतियुनिट, २७ हाॅर्सपाॅवरच्या वरील उद्याेग १७४ पैसे, अाैद्याेगिक ग्राहक उच्चदाब १४९ ते १५८