आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रिक हबसाठी जागा हस्तांतरणाचा मार्ग माेकळा, पुढच्या अाठवड्यात कॅबिनेटमध्ये मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकराेड - केंद्रीय ऊर्जा मंत्रालयांतर्गत नाशिक जिल्ह्यात शिलापूर येथे उभारण्यात येणाऱ्या केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थेच्या प्रयाेगशाळेसाठी अर्थात ‘इलेक्ट्रिक हब’ला राज्य शासनाच्या सर्व परवानग्या मिळाल्या असून, जागा हस्तांतरणाचा मार्ग माेकळा झाला अाहे. याबाबतच्या प्रस्तावाला पुढच्या अाठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गाेडसे यांनी दिली.

जिल्ह्यात १५ माेठे ४२० लघु-मध्यम विद्युत घटक नाेंदणीकृत अाहेत. त्यात सुमारे २६८४ काेटी रुपयांची गुंतवणूक असून, ४६८६ जणांना राेजगार उपलब्ध झालेला अाहे. यासर्व उद्याेगांना इलेक्ट्रिकल जाॅबची तपासणी करण्यासाठी बंगळुरू किंवा भाेपाळला जावे लागते. ही प्रयाेगशाळा नाशिकला सुरू व्हावी, यासाठी खासदार हेमंत गाेडसे यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गाेयल यांच्याकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला. संशाेधन केंद्राने नाशिकला विशेष बैठक घेऊन जागेची पाहणी केली. या हबसाठी १३६८.९० काेटी रुपये खर्च अपेक्षित असून, केंद्राने प्रस्ताव मंजूर करून गेल्या वर्षी अाॅगस्टमध्ये ११५ काेटी रुपयांची तरतूद केली.

या हबसाठी शिलापूर गावाच्या शिवारातील सर्व्हे नंबर २२० मधील १५० एकर जागेला जिल्हाधिकारी यांनी तत्त्वत: मंजुरी दिल्यानंतर खासदार गाेडसे यांनी जागेच्या ताब्यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. सर्वच विभागांच्या परवानग्या मिळाल्या असून, जागेचे हस्तांतरण केंद्राच्या ऊर्जा संशाेधन केंद्राकडे हाेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीची गरज अाहे. पुढच्या अाठवड्यात हाेणाऱ्या बैठकीत ती मिळाल्यावर उर्वरित निधी मिळण्याचा मार्ग माेकळा हाेणार असल्याचे खासदार गाेडसे यांनी सांगितले.

२७० तंत्रज्ञांना मिळणार राेजगार
इलेक्ट्रिक हब साठी जागा हस्तांतरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी पुढील अाठवड्यात मिळेल. या ‘हब’मुळे २७० तंत्रज्ञ स्थानिकांना राेजगाराची संधी उद्याेग वाढीस चालना मिळेल. हेमंत गाेडसे, खासदार