आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेचा दाब अचानक दुप्पट; उपकरणे जळाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर -बुधवारीमध्यरात्री अचानक विजेचा दाब वाढल्याने केडगाव उपनगरातील अनेक ग्राहकांच्या घरातील दूरचित्रवाणी संच, पंखे, फ्रिज, इनव्हर्टर, ट्यूब यासारखी विद्युत उपकरणे जळाली. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. दरम्यान, शाहूनगरमध्ये बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास जाेरदार वाऱ्यामुळे न्यूट्रल कट झाल्यामुळे विजेचा दाब वाढल्याचे महािवतरणच्या अिधकाऱ्यांनी सांगितले.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास विजेचा दाब अचानक वाढून तो ४४० व्होल्ट झाला. नागरिक सर्वच उपकरणांना व्होल्टेज स्टॅबिलायझर बसवत नाहीत. काही टीव्ही संचांत ती व्यवस्था असते. मात्र, तरीही एकदम दुप्पट विद्युत दाब कोणतेही उपकरण सहन करू शकत नाही. शाहूनगर रेणुकानगरमधील सुमारे ५० ते ६० घरांतील विविध विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान झाले आहे. त्यात एलईडी एलसीडी टीव्ही, साधे टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, पंखे, एसी, सेटटॉप बॉक्स, इन्व्हर्टर आदी उपकरणांचा समावेश आहे.

वीजबिल वेळेत भरल्यास कारवाईसाठी तत्परता दाखवणारे महािवतरणचे अधिकारी, कर्मचारी एवढी मोठी घटना घडूनही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
कोणाचेनुकसान किती?

जेव्हाविद्युत दाब अचानक वाढतो, तेव्हा विद्युत उपकरणातील पॉवर सप्लायचे युनिट जळते. या युनिटमधील आय. सी.ची (इंटिग्रटेड सर्किट) किंमत वेगवेगळी असते. विजेचा दाब वाढल्यावर प्रथम बळी जातो तो या आय. सी.चा. त्याची किंमत पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत असते. त्यामुळे नागरिकांना एक उपकरण दुरुस्त करण्यासाठी किमान आठशे ते तीन हजार रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. या खर्चाचा अचानक बोजा टाकणारे महावितरण नागरिकांना काही दिलासा देणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

जबाबदारीकोणाची?
इलेक्ट्रॉनिक्सउपकरणे जळल्यानंतर नागरिकांनी महािवतरणशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. कर्मचारी घटनास्थळी आले. कुठे बिघाड आहे, याची पाहणी करून निघून गेले. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची भरपाई कोण देणार? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. महािवतरणने नुकसान भरपाई द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. तर, महािवतरण म्हणते नागरिकांनी व्यवस्थित अर्थिंग करून घ्यावी. अर्थिंग व्यवस्थित नसेल, तर अशी अडचण उद््भवू शकते. कारण सुरळीत वीज पुरवठा ही महावितरणची जबाबदारी आहे. मुळात विजेचा दाब दुप्पट होण्यात नागरिकांची चूक कशी होऊ शकते, असा नागरिकांंचा सवाल आहे. विशेष म्हणजे हा दाब किती वाढला हे अधिकारी सांगू शकत नव्हते. काही कर्मचाऱ्यांनी मात्र हा दाब मोजून तो ४४० व्होल्ट असल्याचे खात्रीपूर्वक सांगितले. सध्या पावसाळा सुरू असल्याने वीज यंत्रणेतील बिघाडांचे प्रमाण वाढले आहे. त्याचाही फटका नागरिकांना बसत आहे.
बुधवारीमध्यरात्री अचानक विजेचा दाब वाढल्याने केडगाव उपनगरातील अनेक ग्राहकांच्या घरातील दूरचित्रवाणी संच, पंखे, फ्रिज, इनव्हर्टर, ट्यूब यासारखी विद्युत उपकरणे जळाली. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. दरम्यान, शाहूनगरमध्ये बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास जाेरदार वाऱ्यामुळे न्यूट्रल कट झाल्यामुळे विजेचा दाब वाढल्याचे महािवतरणच्या अिधकाऱ्यांनी सांगितले.

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास विजेचा दाब अचानक वाढून तो ४४० व्होल्ट झाला. नागरिक सर्वच उपकरणांना व्होल्टेज स्टॅबिलायझर बसवत नाहीत. काही टीव्ही संचांत ती व्यवस्था असते. मात्र, तरीही एकदम दुप्पट विद्युत दाब कोणतेही उपकरण सहन करू शकत नाही. शाहूनगर रेणुकानगरमधील सुमारे ५० ते ६० घरांतील विविध विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान झाले आहे. त्यात एलईडी एलसीडी टीव्ही, साधे टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, पंखे, एसी, सेटटॉप बॉक्स, इन्व्हर्टर आदी उपकरणांचा समावेश आहे.

वीजबिल वेळेत भरल्यास कारवाईसाठी तत्परता दाखवणारे महािवतरणचे अधिकारी, कर्मचारी एवढी मोठी घटना घडूनही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
कोणाचेनुकसान किती?

जेव्हाविद्युत दाब अचानक वाढतो, तेव्हा विद्युत उपकरणातील पॉवर सप्लायचे युनिट जळते. या युनिटमधील आय. सी.ची (इंटिग्रटेड सर्किट) किंमत वेगवेगळी असते. विजेचा दाब वाढल्यावर प्रथम बळी जातो तो या आय. सी.चा. त्याची किंमत पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत असते. त्यामुळे नागरिकांना एक उपकरण दुरुस्त करण्यासाठी किमान आठशे ते तीन हजार रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. या खर्चाचा अचानक बोजा टाकणारे महावितरण नागरिकांना काही दिलासा देणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

अर्थिंग योग्य असल्याची खबरदारी घ्या
शाहूनगरमध्येझालेल्या झालेला फॉल्ट कर्मचाऱ्यांना शोधून काढला. वाऱ्यामुळे हा न्यूट्रल कट झाला आहे. वीज मीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या तारांची स्थिती योग्य असल्याबाबतची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून करून घ्यावी घरातील वीज जोडणीसाठी लागणारे साहित्य आयएसआय प्रमाणित असावे. तसेच सर्व उपकरणांचे अर्थिंग योग्य असल्याबाबतची खबरदारी घ्यावी. योग्य अर्थिंगमुळे शॉकची तीव्रता कमी होते.'' पी.एस. भालेराव, अितरिक्तकार्यकारी अिभयंत्या, महाविरतण.

न्यूट्रल कट झाल्याने दाब
विजेचादाब वाढण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. अचानक दाब वाढून उपकरणे जळाल्याच्या घटना यापूर्वीही झाल्या आहेत. न्यूट्रल कट झाल्यावर दाब वाढण्याची शक्यता असते. सिंगल फेजसाठी २३० व्होल्टेज असते, तर थ्री फेजसाठी ४४० व्होल्टेजचा वीजपुरवठा सुरू असतो. अचानक दाब वाढल्यामुळे किती व्होल्टेज जादा दाब वाढला हे मात्र सांगता येत नाही, असे अतिरिक्त कार्यकारी अिभयंत्या पी. एस. भालेराव यांनी सांगितले.

थ्री पिन सॉकेट वापरावे
उच्चदाब असलेल्या मिक्सर, हिटर, गिझर, वातानुकूलित यंत्र, फ्रिज या उपकरणांसाठी थ्री पिन सॉकेटचाच वापर करावा. अशा थ्री पिन सॉकेटमध्ये अर्थिंगची व्यवस्था असते. आकाशात विजांचा कडकडाट होत असेल, तर वीज उपकरणे बंद करून प्लग काढून ठेवावा. वीज पडल्यास त्या भागातील विद्युत प्रवाहाचा उच्च दाब वाढून विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, असे महािवतरणतर्फे सांगण्यात आले.

वीज नियंत्रण पूर्ववत
घटना घडल्यानंतर गुरुवारी सकाळी महािवतरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शाहूनगर केडगाव उपनगरांत पाहणी केली. न्यूट्रल कट शोधून दुरुस्ती करून वीज नियंत्रण पूर्ववत आणले. अशी समस्या पुन्हा उद््भवणार नाही. या बाबतही कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.'' प्रवीणश्रीवास्तव, कनिष्ठअिभयंता, महािवतरण.