आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Electricity Customers Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जादा आकारणी परतीचे वीज ग्राहक न्यायमंचचे आदेश, नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीकडे करण्यात आली होती तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जादाएच. पी. दराने जास्त वीज आकारणी केलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश वीज ग्राहक न्यायमंचने दिले आहेत. तक्रारदाराने जिल्हा ग्राहक पंचायतकडे याबाबत तक्रार केली होती.
तक्रारदार प्रा. श्रीकांत जाधव (पानगव्हाणे) यांनी निफाड येथे शेतीकरिता २००६ मध्ये एचपीचे कृषिपंप वीज जोडणी केली होती. सुरुवातीला नियमानुसार एचपीचे बिल येत होते. २००८ मध्ये महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या संगणकामध्ये एवजी एचपीचे वीज बिले देण्यास सुरवात झाली. जाधव यांनी याबाबत उगाव, निफाड, चांदवड, इतर ठिकाणी तक्रारी केल्या. कंपनीकडून बिल भरा, नंतर बघू, असे सांगण्यात येत होते. जाधव यांनी ग्राहक पंचायतीचे विलास देवळे यांच्याकडे तक्रार केली होती. भरपाई मिळावी याकरिता वीज ग्राहक गाऱ्हाणे न्यायमंच नाशिक यांच्याकडे तक्रार केली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद होऊन वीज वितरण कंपनीस न्यायमंचाने २००८ ते २०१४ या कालावधीत भरलेले एचपीचे बिल टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश दिले.