आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electricity Department, ,Latest News In Divya Marathi

नवीन पोलसाठी जुन्यांची कापणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याची ओरड होत असताना दुसरीकडे मात्र विद्युत विभागाची उधळपट्टी सुरू आहे. या विभागाने नवीन पोल लावल्यानंतर जुने पोल थेट जमिनीपासून कापण्याचा उद्योग सुरू केला असल्याने, नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उपनगर ते जेलरोड रस्त्यावर जुन्या पथदिपांच्या बाजुला नवीन पोल उभारण्यात आले होते. त्यानंतर आता खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून जुने पोल काढण्याला सुरुवात झाली आहे. हे पोल इतरत्र उपयोगी पडू शकतील, याचा काहीएक विचार न करता पोल बुडापासून कापले जात आहेत. पोलवरील मक्यरुरी व त्याच्या ब्रॅकेट्सची काळजी घेतली जात नसल्याने शुक्रवारी अनेक ब्रॅकेट जमिनीवर पडून तुटले, तर काही लाईट्स फुटले.
पथदिपाच्या पोलची उंची 7 ते 12 मीटरपर्यंत, तर किंमत सुमारे 50 हजार रुपये असते. याचा कोणताही विचार न करता नुकसान केले जात आहे.
कामगार जखमी
शेलार मळ्यासमोरील पोल जमिनीपासून कापल्यानंतर तो थेट एका कामगाराच्या डोक्यात पडल्याने र्शीकांत नामक कामगार जखमी झाला. पोल कोसळताना रस्त्यावर सुदैवाने कोणी नव्हते. मात्र, या घटनेत लाईट फुटून नुकसान झाले.