आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

96 हजार वीज कर्मचारी होणार संपात सहभागी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- राज्यातील सर्व प्रमुख कामगार संघटनांनी संयुक्तपणे पुकारलेल्या दि. 20, 21 फेब्रुवारी रोजीच्या 48 तासांच्या संपात राज्यातील वीज कंपन्यांतील 96 हजार वीज कर्मचारी, अधिकारी यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा यांनी दिली.

नाशिकरोड येथे प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. शासन व व्यवस्थापनाच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात देशातील सर्व केंद्रीय व राज्य कामगार संघटना, इंडस्ट्रीयल फेडरेशन, स्वतंत्र युनियन असोसिएशनसह वाहतूक व्यावसायिक, व्यापारीवर्ग या संपात सहभागी होणार आहेत. वीज कंपन्यांतील स्टाफ सेटअप सुधारावे, कंत्राटीकरण फॅ्रचाईसी व खासगीकरण धोरण रद्द करा, महिलांना बाळंतपणाची रजा विनाअट द्यावी, सेवा- शर्तीतील एकतर्फी बदल्यांचे निर्णय घेऊ नये, मेडिक्लेम योजना अमलात आणावी, महाजनको अंतर्गत वीजनिर्मिती करावी आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच सर्व संघटनांचा हा दोन दिवसांचा संप होणार आहे.