नाशिक - ‘महावितरण’नेठेवलेल्या प्रस्तावित वीजदरवाढीच्या प्रस्तावाविराेधात साेमवारी (दि. ४) वीजबिलांची हाेळी करण्याचा अाणि वीज नियामक अायाेगासमाेरील सुनावणीकरिता माेठ्या प्रमाणावर हरकती दाखल करण्याचा एकमुखी निर्णय शुक्रवारी घेण्यात अाला अाहे.
निमा हाऊस येथे वीजग्राहक संघटनेच्या वतीने झालेल्या अाैद्याेगिक संघटना अाणि ग्राहक प्रतिनिधी यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. यावेळी व्यासपीठावर वीज नियामक अायाेगाचे ग्राहक प्रतिनिधी अशाेक पेंडसे, ‘निमा’चे अध्यक्ष संजीव नारंग, सरचिटणीस मंगेश पाटणकर, ‘अायमा’चे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बाेरस्ते, अॅड. सिद्धार्थ साेनी, मिलिंद राजपूत, वीज मंडळाचे माजी मुख्य अभियंता अरविंद गडाख अादी उपस्थित हाेते.
महावितरणने पुन्हा एकदा वीजदरवाढीचा प्रस्ताव ठेवला असून, त्याबाबतची सुनावणी वीज नियामक अायाेगाकडून २६ जुलै राेजी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियाेजन भवन येथे सकाळी १०.३० वाजता हाेणार अाहे. सध्याच महावितरणची वीज इतर राज्यांच्या खासगी वीज कंपन्यांच्या तुलनेत प्रचंड महागडी असून, नव्याने वीजदरवाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर घरगुती, व्यापारी अाणि अाैद्याेगिक वीजग्राहकांना याचा माेठा फटका दरवाढीच्या रूपाने साेसावा लागणार अाहे. याविराेधात अाता या तिन्ही प्रकारच्या वीजग्राहकांनी जुलैपूर्वीच माेठ्या प्रमाणावर हरकती नाेंदवाव्यात, असे या बैठकीत निश्चित करण्यात अाले.
महागडी वीज खरेदी, वितरणातील गळती अाणि कृषिपंपांकडील थकबाकी हे प्रमुख कारण महावितरण कंपनीच्या वीजदरवाढीमागे असून, ते सुधारावे, याची जबाबदारी महावितरणची असून, सामान्य ग्राहकांचा याच्याशी काडीमात्र संबंध नसल्याने त्यांच्या माथी दरवाढ लादणे पूर्णत: चुकीचे असल्याचे वीज नियामक अायाेगाचे ग्राहक प्रतिनिधी अशाेक पेंडसे यांनी सांगितले. राज्यात कृषिपंपांच्या नावावर वीजदरवाढ लादली जात असून, या पंपांना रीडिंगनुसार वीजबिल द्यावे, अशी मागणी करण्याची सूचना वीज मंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता अरविंद गडाख यांनी केली.
वीज नियामक अायाेगाकडे वीजदरवाढीच्या प्रस्तावाविराेधात नाेंदविण्यात येणाऱ्या हरकतींत ग्राहकांनी स्वस्त दरात वीज महावितरणने काेठून खरेदी करावी ते सांगावे, त्याचबराेबर महावितरणने क्राॅस सबसिडीचा खाेटा प्रचार थांबवावा, कृषिपंपांकरिताच्या वीज वापराचे अाॅडिट केले जावे, व्यावसायिक व्यवस्थापन असावे अाणि प्रभावी ग्राहक सेवा द्यावी, अशा मागण्या ग्राहकांनी कराव्यात, असे अॅड. साेनी यांनी सर्वप्रकारच्या वीजग्राहकांना अावाहन केले.
महावितरणच्या वीजदरवाढीच्या प्रस्तावाविराेधात जनभावना लक्षात घेतल्यास सकारात्कम निर्णय झाल्यास याप्रश्नी सर्वपक्षियांना बराेबर घेत रस्त्यावर उतरून अांदाेलन करण्याचा इशाराही शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांनी यावेळी दिला.
सर्व पक्षांना बराेबर घेऊन रस्त्यावर उतरू
एकीकडे‘मेक इन महाराष्ट्र’ म्हणायचे, दुसरीकडे राज्यात तीन प्रकारचे वीजदर उद्याेगांना द्यायचे. यामुळे स्टील उद्याेग गुजरात, सिल्वासामध्ये स्थलांतराचा धाेका निर्माण झाला असून, हजाराे लाेक बेराेजगार हाेतील. सरकारच्या या दुजाभाव करणाऱ्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, त्याकरिता सर्व पक्षांना साेबत घेऊ, असा इशारा शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांनी यावेळी दिला.