आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवात वीज महावितरणचे विघ्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - गणेशोत्सवाच्यापहिल्याच दिवशी महावितरणमुळे विघ्न आले. शुक्रवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत विजेचा लंपडाव सुरू हाेता. यामुळे घरगुती मंडळांना गणरायाची स्थापना करण्यात अडचण निर्माण झाली. गणेशाेत्सवात अखंडित विजेची मागणी करणाऱ्या सर्वसामान्यांसह मंडळाच्या कार्यकर्त्यांना उत्सवातील पहिली अारती करण्यासाठी विजेची वाट बघावी लागली.
शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा दुपारी १.४५ वाजता पूर्ववत झाला. त्यानंतर पावसाला सुरुवात होताच काही वेळात वीजपुरवठा खंडित झाला. तब्बल दोन तासांनंतर सायंकाळी वाजता पुरवठा पूर्ववत झाला. त्यानंतर दहा मिनिटात चार वेळा वीज जा-ये करत होती. शिवाजीनगर सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे पुरवठा खंडित झाला. जाेरदार पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण झाल्याचा खुलासा महावितरणने केला.