आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरळीत विजेसाठी महावितरणची तिसर्‍या दिवशीही धावपळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दोन दिवस झालेल्या वादळी पावसामुळे महावितरण कंपनीच्या कामाचा बोजवारा उडाल्याने वीज पुरवठा खंडित होऊन संपूर्ण शहर हे अंधारात बुडाले होते. महावितरणच्या या भोंगळ कामाबद्दल नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असला तरी महावितरणच्या कर्मचार्‍यांकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तिसर्‍या दिवशीही प्रयत्न सुरू होते.
वार्‍यामुळे विजेचे उच्चदाब आणि लघुदाबाचे एकूण 139 खांब पडले, तर सुमारे पावणेतीन किलोमीटर लांबीची विद्युत तार तुटल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचार्‍यांना अडथळा येत होता. वार्‍याचा वेग कमी-जास्त होत असल्याने तारा एकमेकांना घासून पुरवठा खंडित होत होता. बुधवारी सातपूर औद्योगिक वसाहतीत वीज खंडित झाल्याने कंपन्यांमधील कामकाज ठप्प झाले होते. दोन दिवसांनंतर पुन्हा महावितरणने मान्सूनपूर्व कामांच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. यामध्ये कंडक्टर उपलब्ध करणे, खांब सरळ करणे, ऑईल चेक करणे आदी कामे सुरू करण्यात आली.