आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 तास वीज गायब; महावितरणच्या दुर्लक्षाने संताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी - शहरातील स्वामी समर्थनगर परिसरात 18 तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले. महावितरण कार्यालयात दूरध्वनी करून अधिका-यांना सांगूनही दुर्लक्ष केल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.

इगतपुरी शहरातील ग्रामीण रुग्णालयाजवळील स्वामी समर्थनगर परिसरात बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास डी.पी.त बिघाड झाल्यानंतर वीज प्रवाह अचानक खंडित झाला. सतर्क नागरिकांनी तत्परतेने महावितरण कार्यालयात दूरध्वनी केले. दूरध्वनी केल्यानंतर थोड्या वेळात येतो, असे कर्मचा-याने सांगितले. परंतु, रात्री 12 वाजेपर्यंत कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याने पुन्हा दूरध्वनी करण्यात आले. मात्र, कर्मचा-यांनी दूरध्वनी न उचलत कामचुकारपणाचे दर्शन घडविले. वीज नसल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक व चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, गुरुवारी सकाळी 9 वाजता दूरध्वनी केला असता रात्रीचे कर्मचारी घरी गेले आहे, काय अडचण आहे ते सांगा, अशी विचारणा करून कर्मचारी येतील, असे सांगण्यात आले. अखेर दुपारी दोन वाजता मुहूर्त लावून कर्मचा-यांनी घटनास्थळी हजेरी लावली. एक तासानंतर पोलवरील कामे करून 3 वाजता म्हणजे 18 तासांनंतर वीजप्रवाह सुरळीत केला.