आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षाच्या प्रारंभी हाेणार कचऱ्यापासून वीजनिर्मिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जर्मन सरकारच्या संयुक्त विद्यमाने नाशिक महापालिका ‘कचऱ्यापासून वीजनिर्मिती’चा प्रकल्प राबवित असून, डिसेंबरअखेरपर्यंत या प्रकल्पाचे बांधकाम पूर्णत्वास येत अाहे. नवीन वर्षाच्या प्रारंभी हा प्रकल्प सुरू हाेणार अाहे. प्रकल्पाचा अाढावा घेण्यासाठी जर्मन सरकारचे प्रतिनिधी थाॅमस काॅटन एबे यांनी गुरुवारी (दि. २०) पालिका प्रशासनाची भेट घेतली. जर्मन सरकारचा भारतातील हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प ठरणार अाहे.
जर्मनच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अांतरराष्ट्रीय पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार अाहे. यासाठी सुमारे ६.८ काेटी रुपये खर्च केला जाणार अाहे. प्रकल्पात दरराेज सुमारे २० मेट्रिक टन अाेला कचरा १० किलाे लिटर सार्वजनिक शाैचालयातील मलजल अशा एकूण ३० मे. टन कचऱ्यावर प्रक्रिया हाेणार अाहे. त्यातून बायाेगॅस (मिथेन) तयार करून त्याव्दारे वीजनिर्मिती करण्यात येणार अाहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १० वर्षांच्या कालावधीसाठी ताे चालविणे, केंद्राची देखभाल दुरुस्ती करणे ही जबाबदारी कंपनीची असेल. प्रकल्पासाठी अावश्यक कचरा मलजल हे बंद वाहनांमधून अाणल्यानंतर वाहनावरील पंपाद्वारे प्रकल्पातील पल्पर या युनिटमध्ये लगेचच टाकून प्रक्रिया केेली जाईल. त्यामुळे दुर्गंधी पसरणार नाही.

मलजल शुद्धीकरण केंद्रही : प्रकल्पातहाॅटेलचा कचरा मलजलावर प्रक्रिया केल्यावर ते टन घन स्वरूपात ते १० हजार लिटरपर्यंत द्रव स्वरूपात कचरा शिल्लक राहील. घनकचऱ्यापासून खत तयार करण्यात येईल. तसेच, दरराेज निघणाऱ्या ते १० हजार लिटर द्रव स्वरूपातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार अाहे. या शुद्धीकरण प्रकल्पातून निघणाऱ्या पाण्याचा वापर दैनंदिन साफसफाई झाडांना सिंचनासाठी करण्यात येईल. प्रकल्पात वापरण्यात येणाऱ्या १० टन मलजलाचा पर्यावरणावर काेणताही दुष्परिणाम हाेणार नाही, असा दावा प्रशासनाने केला अाहे.

दरराेज वाचणार ३० हजार रुपये : कचरासंकलन वाहतुकीसाठी १३०० रुपये प्रति मेट्रिक टन प्रक्रियेस हाेणारा ४०० रुपये प्रति मेट्रिक टन असा एकूण १७०० रुपये प्रति मेट्रिक टन इतका खर्च सध्या हाेताे. या प्रकल्पामध्ये दरराेज कचरा वाहतुकीची विल्हेवाटीची व्यवस्था हाेणार अाहे. त्यामुळे प्रतिदिन सुमारे ३० हजार रुपये अाणि प्रतिमहिना लाख रुपये इतक्या खर्चाची बचत हाेईल, असा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात अाला.

हे अाहेत वैशिष्ट्य
{प्रकल्पामध्ये पालिकेची काेणतीही भांडवली गुंतवणूक नसेल
{ प्रकल्प पूर्णपणे पालिकेच्या मालकीचा राहील. ठेकेदारास जमीन अथवा प्रकल्पामध्ये मालकी हक्क मिळणार नाही.
{ प्रकल्पासाठी लागणारा अाेला कचरा (हाॅटेल वेस्ट भाजीपाला वेस्ट) मलजल वाहतुकीची जबाबदारी कंपनीची असेल.
{ प्रकल्प उभारणीसाठी १०० बाय ६० मीटर जागेचा वापर केला जाणार
{ २० मेट्रिक टनापर्यंत अाेल्या कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया हाेऊ वीजनिर्मितीमध्ये सहभाग नाेंदविला जाईल.
{ पर्यावरण कायद्याची अंमलबजावणी काटेकाेरपणे हाेणे अाता शक्य हाेईल.

असा अाहे खर्च
{८,०२,७९,६५८:प्रकल्पासाठी एकूण खर्च
६,८०,००,०००: इतकेअनुदान महापालिकेस हाेणार उपलब्ध
१,२५,०९,४७८: रुपयांचापहिला हप्ता महापालिकेस यापूर्वीच प्राप्त झाला
१,२२,७९,६५८: रुपयांचाखर्च ठेकेदार ग्रीन अॅण्ड क्लीन साेल्यूशन (बंगळुरू) करणार
१२,००,०००: रुपयांचीवार्षिक बचत पालिकेची हाेणार

असे असेल वीज वितरणचे समीकरण
९९००० : इतकेयुनिट वीज दरमहा माेफत पुरविणार
५,९४,०००: इतक्यारकमेची वीज सहा रुपये प्रति युनिटप्रमाणे पालिकेस माेफत मिळणार
४,९४,८७७: रुपयांचीवीज संबंधित कंपनीस दर महिन्याला देण्यात येणार
बातम्या आणखी आहेत...