आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका कार्यालयांत २२ लाखांची वीजबचत शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनासह सर्व विभागीय कार्यालयांतील लहानसहान बदलातून वर्षाकाठी तब्बल २२ लाख रुपयांची वीजबचत शक्य असल्याची महत्त्वाची बाब महावीर एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. यासंदर्भातील ‘एनर्जी ऑडिट रिपोर्ट’ या विद्यार्थ्यांनी महापालिका आयुक्तांना सादर केला.
राजीव गांधी भवनासह सातपूर सिडको विभागीय कार्यालयांत होत असलेली विजेची नासाडी रोखतानाच वीजबचतीसाठी प्रभावी पर्याय सुचविण्याच्या उद्देशाने ऑक्टोबर २०१५ मध्ये संस्थेच्या तृतीय वर्षातील कपिल साळवे, विशाल पवार, श्रेयस बाग आणि स्वप्नील पाटील यांनी एनर्जी ऑडिट करण्याचे ठरविले होते. उपमहापौर गुरुमित बग्गा गटनेते अशोक सातभाई यांच्याशी या संदर्भात चर्चा केल्यानंतर आणि त्यांनी विद्यार्थ्यांना यासंदर्भात सर्व परवानग्या उपलब्ध करून दिल्यानंतर एनर्जी ऑडिट सुरू झाले. विद्यार्थ्यांनी राजीव गांधी भवनासह सातपूर सिडको विभागीय कार्यालयांतील विद्युत उपकरणे, त्यांच्याकडून होणारा विजेचा वापर अशा विविध बाबींची नोंद घेतली.

त्यासाठी लक्स मीटर, कम्बर्षण अनेलायझर, कॉँटॅक्ट थर्मामीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर, स्पीड मेजरमेंट्स इत्यादी उपकरणांचा वापर करण्यात आला. त्या माध्यमातून एखाद्या खोलीचा आकार, त्यात पुरेशा प्रकाशासाठी आवश्यक दिव्यांची क्षमता आणि प्रत्यक्षात लावण्यात आलेले दिवे, फॅन अशा विविध बाबींची नोंद घेण्यात आली.

विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सर्व नोंदींच्या विश्लेषणातून महापालिका या तीन कार्यालयांतून वर्षाकाठी तब्बल २२ लाख रुपयांची वीजबचत करू शकते, असे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांनी हा रिपोर्ट नुकताच महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना सादर केला. रिपोर्ट पाहून आयुक्तांनी या कामाबद्दल विद्यार्थ्यांची पाठ थोपटली. या कामासाठी विद्यार्थ्यांना उपमहापौर गुरुमित बग्गा, गटनेते अशोक सातभाई तसेच महापालिका अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. पालिकेच्या सिडको कार्यालयात एकूण ३२ किलोवॅट विजेचा वापर होतो. येथेही काही उपाययोजना केल्यास लाख ७२ हजार रुपयांची वीजबचत शक्य आहे. वीज वापरात ट्यूबलाइट्स सीएफएलचा वापर सुमारे ५१ टक्के असून, पंख्यांचा वापर ३० टक्के आहे. याशिवाय, पालिकेच्या सातपूर कार्यालयात एकूण १३ किलोवॅट वीज वापरली जात असून, या कार्यालयात काही उपाययोजना केल्यानंतर लाख हजार रुपये किमतीची वीज वर्षाकाठी वाचवली जाऊ शकते. या उपाययोजनांत पालिका कर्मचाऱ्यांमध्ये वीजबचतीविषयी प्रबोधन करणे, पंखे, लाइट वापरात ऑटोमेशन करणे, एलईडी दिव्यांचा वापर केल्यास विजेचा अपव्यय टाळता येऊ शकतो, असेही विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक तथा महावीर तंत्रनिकेतनच्या विद्युत अभियांत्रिकी शाखेचे विभागप्रमुख प्रा. सागर पाटील यांनी या वेळी सांगितले.

उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात आम्ही असेच काम करणार असून, सामाजिक भावनेतून आम्ही हे काम केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरीश संघवी, सदस्य राहुल संघवी, उपाध्यक्षा वर्षा संघवी, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माया पडवळ, महावीर पॉलिटेक्निक काॅलेजचे प्राचार्य मनोज बुरड, उपप्राचार्य संभाजी सगरे प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
महापालिकेच्या कार्यालयांतील एनर्जी ऑडिटसंदर्भातील रिपोर्ट पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना सादर करताना विद्यार्थी.

{ मुख्य इमारतीसह सातपूर सिडको विभागीय कार्यालयांचे झाले ऑडिट.
{ तब्बल महिन्यांच्या पाहणीनंतर विद्यार्थी अहवाल महापालिका आयुक्तांना केला सादर.
{ त्यानुसार महापालिका वाचवू शकते वर्षाकाठी २२ लाख रुपयांची वीज.
{ सुचविले विविध उपाय.
राजीव गांधी भवन या महापालिकेच्या मुख्यालयात एकूण १६२ किलोवॅट वीज वापरली जात असून, काही उपाययोजना केल्यानंतर ११ लाख ८५ हजार रुपयांची वीज वाचवली जाऊ शकते. विद्युत वापरात ट्यूबलाइट आणि सीएफएलचा वापर सुमारे ५३ टक्के असून, झेरॉक्स मशीन ३४ टक्के, प्रिंटर ३३ टक्के, पंखे १७ टक्के, तर कॉम्प्युटरसाठी २३ टक्के वीज वापरली जाते. अशा वेळी केवळ ट्यूबलाइट सीएफएल बदलून त्याऐवजी एलईडी लाइट्सचा वापर केल्यास ५३ टक्क्यांहून अधिक म्हणजे सध्याच्या वीजवापराच्या तुलनेत तब्बल ८० टक्के वीजबचत होऊ शकते. अर्थात वर्षाकाठी मुख्यालयात या बदलातून लाख ३१ हजार रुपयांची वीज वाचविली जाऊ शकते, असे विद्यार्थी प्रतिनिधी विशाल पवार कपिल साळवे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...