आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक तिजोरीत पैसाअडका ठेवून व्हा निर्धास्त...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - काळानुरूप सर्वच क्षेत्रात बदल होत आहेत. त्यानुसारच तिजो-यांच्या प्रकारांमध्येही आधुनिकता दिसत लागली आहे. पूर्वी तिजोरी ही फक्त बँका, शासकीय आस्थापने आणि श्रीमंतांकडे असायची. सर्वसामान्यांच्या नजरेस पडायची ती केवळ चित्रपटांतूनच. परंतु, सध्या लूटमार, घरफोडी तसेच दरोडे हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्याने सुरक्षिततेलाही तेवढेच महत्त्व मिळत आहे आणि याच दृष्टीने आता लहान व आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा तिजो-यांना मागणी वाढली आहे.
तिजोरी जेवढी भक्कम, तेवढे तिचे वजन जास्त असे काहीसे गणित त्या काळी होते. त्यामुळे ने-आण करण्यासाठी ती अडचणीची ठरत असते. बहुतेक नागरिक हे घरातील दागदागिने व रक्कम हे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात. परंतु, तिजोरी बनवणा-या कंपन्यांनी नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन लहान-लहान तिजोरी तयार केल्या. पण, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स सिक्युरिटी सिस्टीम बसवून या तिजोरींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळेच आता घरीच तिजोरी ठेवण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे.
तिजोरीमध्ये मॅन्युअली सेफ व इलेक्ट्रॉनिक्स सेफ असे दोन प्रकार असून, या तिजोरी तीन हजारांपासून ते 18 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. पूर्वी या तिजो-या फक्त किल्लीनेच उघडता येत होत्या. त्यामुळे बनावट चाव्यांचा वापर करून चोरी होत असे. पण, आता आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीममध्ये याचा धोका नसतो. यामध्ये किल्ल्यांबरोबरच विशिष्ट कोड नंबर दाबल्यानंतरच ती तिजोरी उघडते.
इन्श्युरन्स मिळतो - आता तिजोरीचे आकारमान व वजन कमी झाले आहे. त्यामुळे लॉकरसाठी बँकेला भाडे देण्यापेक्षा तिजोरी वापरणे केव्हाही चांगले. तसेच चोरी झाल्यावर क्लेमसाठी इन्श्युरन्स कंपन्यादेखील तिजोरीला प्राधान्य देत असतात. - अजय बुराडे, स्वान इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम
एसएमएसची सुविधा - पूर्वी तिजोरी ही मोठी, वजनदार व चावीची होती. परंतु, आता बाजारात लहान तिजो-या उपलब्ध असून, एखादी अनुचित घटना घडल्यावर मोबाइलवरही लगेच एसएमएस येईल, अशाही तिजोरी उपलब्ध आहेत. - नितीन भंडारी, पिंपळगाव