आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेश: आता उत्कंठा दुसऱ्या गुणवत्ता यादीची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या गुणवत्ता यादीने यंदा प्रथमच उच्चांक गाठल्याने या यादीत स्थान मिळू शकलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे लक्ष आता दुसऱ्या गुणवत्ता यादीकडे लागले आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत विज्ञानचा कट ऑफ ९४ टक्क्यांवर लागल्याने दुसऱ्या यादीत ९२ टक्क्यांवरच खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विज्ञान शाखेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तर, वाणिज्य शाखेचा कट ऑफही तीन ते चार टक्क्यांनी वरच घसरण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, २५ जूनपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा (एचएससी व्होकेशनल) या शाखांसाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत २० ते २१ हजार जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या महाविद्यालयांत मेरिट अर्ज केल्याने पहिल्या गुणवत्ता यादीचा कट ऑफ पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शहरातील विविध महाविद्यालयांत तीन हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. शनिवार(दि. २५ जून)पर्यंत प्रवेशाची मुदत असल्याने दोन दिवस प्रवेशासाठी संधी असेल. विज्ञान शाखेसाठी दुसऱ्या यादीत ९० ते ९२ टक्क्यांचा कट ऑफ राहील, तर वाणिज्यसाठी ८१ ते ८३ टक्क्यांवर येईल, असा अंदाज आहे.

पहिल्याच दिवशी हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश
अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तीन हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. केटीएचएम कॉलेजात विज्ञानचे ३००, वाणिज्यचे २००, तर कला शाखेचे १२५ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. एचपीटी-अारवायकेमध्ये विज्ञानचे १८५, तर कला शाखेचे १६७ प्रवेश पूर्ण झाले.

२७ जूनला दुसरी यादी होणार जाहीर
२५जून- पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.
२७ जून- दुसरी प्रवेश यादी जाहीर करणे.
२८ जून- दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.
२८ जून- तिसरी प्रवेश यादी जाहीर करणे.
२९ जून- विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.
२९ जून- चौथी यादी जाहीर करणे.
३० जून- विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शिल्लक राहिलेल्या जागांवर गुणानुक्रमानुसार प्रवेश देणे.
बातम्या आणखी आहेत...