आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भविष्य निधी’साठी हयातीच्या दाखल्यांकरिता रांगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कर्मचारी पेन्शन योजना 1995 च्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या पेन्शनधारकांना आपल्या हयातीचा दाखला आणि पुनर्विवाह केल्याचा दाखला 30 नोव्हेंबरपर्यंत द्यावा लागणार आहे. या कार्यालयाकडे हा दाखला वेळेत पोहोच व्हावा याकरिता पेन्शनधारकांची प्रचंड गर्दी बँकांत पाहायला मिळत आहे.

दरम्यान, बहुतेक बँकांत दाखल्यांकरिता अर्ज भरून घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध नसल्याने आणि बहुतेक पेन्शनधारक हे सत्तरीच्या पुढील वयाचे असल्याने त्यांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे दाखले जमा करण्याची मुदत वाढवून मिळण्याची मागणी पेन्शनर्स करीत असले, तरी तूर्तास हे शक्य नसल्याचा निर्वाळा भविष्य निधी कार्यालयाने दिला आहे.
भविष्य निधीच्या नाशिक कार्यालयाद्वारे एक लाखांच्यावर पेन्शनर्सला पेन्शन वितरित केली जाते. सन 1995 च्या पेन्शन योजनेतील पेन्शनर्सकरिता हयातीचा आणि पुनर्विवाह केल्याचा दाखला बँकांद्वारे मागविण्यात आला आहे. ज्या बँकेतून पेन्शन मिळते त्याच बँकांतून हा दाखला भविष्य निधी कार्यालयाला जाणे बंधनकारक असल्याने दरमहा ते 10 तारखेदरम्यान बँकांत दिसणारी पेन्शर्सची गर्दी आणि दाखला जमा करण्यासाठीची गर्दी यामुळे बँकांत मोठ्या रांगा लागत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ईपीएफ दोन वर्षांचे सर्व्हिस वेटेज पेन्शनधारकांना दिले आहेत. जे त्यास पात्र आहेत, अशा सर्व पेन्शनर्सलाही ते महाराष्ट्रात देण्यात यावे, हे न्यायालयाचे आदेश नाशिक कार्यालयाने अंमलात आणल्याने 28 हजार 881 पेन्शनर्सला याचा लाभ मिळाला आहे. किमान एक हजार वेतननिश्चितीनंतर चार-पाच हजारांपासून ते चाळीस हजारांपर्यंत थकबाकी देऊन झालेली वाढ गेल्या महिन्यापासून पेन्शनमध्ये समाविष्ट केली अाहे. बँकिंग किंवा अन्य अडचणींमुळे सर्वांनाच ही रक्कम मिळालेली नाही. 11 डिसेंबर 2014 पर्यंत पेन्शनर्सने प्रतीक्षा करणे गरजेचे असल्याचे आवाहन अखिल भारतीय ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनकडून करण्यात आले आहे. हिशेबात चूक आढळल्यास विनामूल्य मार्गदर्शनासाठी सुधाकर गुजराथी, राजू देसले, रमेश पाध्ये, डी. बी. जाेशी या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा 9371040166 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा संघटनेकडून करण्यात आले आहे.