आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाटा अपडेट करावा लागणार दिवसांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कर्मचारीभविष्य निधी संघटनेच्या (पीएफ) मुख्यालयाला अातापर्यंत प्राप्त झालेल्या विविध अास्थापनांचा केवायसी डाटा तपासून पाहिला असता, त्यात काही वैधता अाणि अखंडता यासंबंधी त्रुटी अाढळल्या अाहेत. ह्या त्रुटी दूर करण्यासाठी मुख्यालयाकडून अास्थापनांना तीन दिवसांची मुदत मिळाली असून, या कालावधीत हा डाटा अपडेट करावा लागणार अाहे.
अास्थापनांना त्रुटी दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी भविष्य निधीच्या मुख्यालयाने हा डाटा उपलब्ध करून दिला अाहे. यासाठी अापल्या संकेतस्थळावर ‘अवर सर्व्हिस’च्या एराेनिअस केवायसी’ लिंकवर क्लिक करून उघडलेल्या पेजमध्ये माहिती भरून संबंधित कंपनी अापला डाटा डाउनलाेड करू शकेल. त्यात दुरुस्ती करून पुन्हा अपलाेड करायचा असून डिजिटल सहीने त्याचे अनुमाेदन करायचे अाहे. यासाठी मुख्यालयाच्या निर्देशानुसार पुढील तीन दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागणार अाहे.
केवायसीमुळेगतिमानता कर्मचारीभविष्य निर्वाह निधी विभागाने केवायसी (नो युवर कस्टमर) बंधनकारक केल्यानंतर अाणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर सदस्यांना दिल्यानंतर संपूर्ण कामकाज अाॅनलाइन पारदर्शकपणे करणे शक्य झाले असून, भविष्य निधीची रक्कम संबंधित व्यवहारांमधील गतिमानता वाढली अाहे. यामुळे केवायसीतील त्रुटी दूर करण्याला अाता प्राधान्य देण्यात अाले असल्याचे कार्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले अाहे.

अशी करता येते त्रुटींची पूर्तता
अापल्या कंपनीचा पीएफ क्रमांक तसेच नाेंदणीकृत माेबाइल क्रमांक टाकून अाेटीपी घ्यावा ताे वापरून डाटा मिळविता येईल. सर्व नियाेक्त्यांनी अापापल्या कंपनीची स्थिती तपासून पहावी केवायसी डाटा चुकला असल्यास दुरुस्त करावा. पुढील टप्प्यातील अाॅनलाइन सुविधा ‘केवायसी’ वर अवलंबून असल्याने युद्ध पातळीवर हे काम पूर्ण हाेणे अावश्यक असल्याचे भविष्य निधी कार्यालयाने स्पष्ट केले अाहे.

प्रत्येक अास्थापनेने पार पाडावी ही जबाबदारी
^वरीलप्रमाणे अास्थापनांनी अापल्या कंपनीची स्थिती तपासावी त्रुटी असल्यास त्या तत्काळ पूर्ण कराव्यात. नाशिकमधीलही काही अास्थापनांनी याबाबत माहिती घेण्याकरिता संपर्क साधला अाहे. जगदीशतांबे, क्षेत्रीय अायुक्त, भविष्य निधी