आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Employment News And Employee Issue At Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एम्प्लॉयमेंट ऑनलाइन, बेरोजगार ऑफलाइन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विविधपरीक्षांच्या निकालानंतर आता बेराजगारांनी आपला मोर्चा एम्प्लॉयमेंटकडे नावनोंदणीसाठी वळवला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऑनलान नोंदणीचा सर्व्हर डाउन असल्यामुळे बेरोजगारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजचे कामे ऑलनलाइन झाले खरे, मात्र आताही बेरोजगार नोंदणी ऑफलाइन असल्याचेच दिसून येत आहेत.

नोकरी मिळेल या आशेवर शेकडो तरुण-तरुणी रोजगार केंद्रात नाव नोंदवत असतात. या एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजच्या योजना, रोजगार मेळावे, तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सरकार दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. मात्र, त्या तुलनेत नाव नोंदविलेल्या ६-७ टक्के तरुणांच्याही पदरात नोकरी पडत नाही. याचे कारण ऑनलाइन नोंदणीला येणारी अडचण. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या वेबसाइटचा सर्व्हर नेहमीच डाउन असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे आता प्रशासनाच्या वतीने ऑनलाइन करण्यात आलेली नोंदणीमुळे किती बेरोजगारांना नोकरी मिळाली याचा विचार होणे गरजेचे आहे.

खासगीकंपन्यांचे काम तेजीत : पूर्वीनोकरीसाठी नावनोंदणीचे एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज एकमेव ठिकाण होते. मात्र, गेल्या काही वर्षात नोकरी मिळवून देणाऱ्या शेकडो प्लेसमेंट एजन्सींचे पेव फुटले. नोकरी मिळवून देणाऱ्या काही वेबसाइट्स सुरू झाल्या आहेत. या एजन्सी आणि वेबसाइटचे काम प्रचंड तेजीत आहे. एखाद्या कंपनीच्या मॅनेजरपासून ते मॉलला लागणा-या हाऊसकीपरपर्यंत वर्षाला जवळपास सव्वा लाख नोक-या या एजन्सीच्या माध्यमातून दिल्या जातात. आपल्या कंपनीसाठी चांगला उमेदवार शोधण्यासाठी अनेक कंपन्या या एजन्सीना तगडे पैसेही मोजण्यास तयार असतात. सरकारी एम्प्लॅयमेंट एक्सचेंजला तसेच पैसे देण्याची गरज नसते. त्यानंतरही या कंपन्यांना प्लेसमेंट एजन्सीनाच प्राध्यान्य का देतात याचा सरकारने विचार करण्याची गरज आहे.

नेहमीच असतो सर्व्हर डाउन...
एम्प्लॉयमेंटएक्स्चेंजच्या वेबसाईटवर जेव्हाही नोंदणीसाठी प्रयत्न करातो. तेव्हा सर्व्हवर डाउन होऊन जातो. प्रशासनाने सर्व्हरच्या बाबतीत विशेष लक्ष दिले पाहिजे. - अंकुशबोराडे