आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएममध्ये खडखडाट, ‘कॅशलेस’चा ग्राहकांना पुन्हा फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यातील काही शहरात नाेटांच्या तुटवड्यामुळे एटीएममध्ये रक्कम उपलब्ध नसल्याच्या तक्रारी समाेर येत असल्याचे पहायला मिळत हाेती, तरी नाशिकमध्ये स्थिती नियंत्रणात हाेती. मात्र शनिवारी शहरात प्रमुख काही बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट असल्याने ग्राहकांचा संताप पहायला मिळाला. नाेटबंदीनंतर पुन्हा एकदा चलन तुटवडा जाणवायला सुरुवात झाली असली, तरी सरकारकडून ‘कॅशलेस’ व्यवहारांचा अाग्रह धरला जात असल्याने कृत्रिम चलन तुटवडा तर निर्माण केला जात नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात अाहे. काही बँकांकडे चलन तुटवडा जाणवत असला, तरी प्रमुख मानल्या जाणाऱ्या स्टेट बँकेत अतिगंभीर म्हणता येईल अशी स्थिती अद्याप नाही. मागणीप्रमाणे अाम्हाला मंगळवारी चलन उपलब्ध हाेईल त्यामुळे तुटवड्याची परिस्थिती निर्माण हाेणार नाही याकरीता काळजी घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
शुक्रवारच्या सार्वजनिक सुटीनंतर शनिवारी शहरातील बहुतांश भागातील एटीएममध्ये राेकड शिल्लक नसल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या यानंतर केलेल्या पाहणीत इंदिरानगर ते मुंबईनाका, सातपूर, सिडकाे, नेहरू गार्डन परिसरातील एचडीएफसी बँक, अायसीअायसीअाय बँक, स्टेट बँक, काही सहकारी बँका यांच्या एटीएममध्ये राेकड शिल्लक नसल्याचे अाढळून अाले. राेकड शिल्लक नसल्याने केवळ ट्रान्झक्शन स्लिप हाती येत असल्याने ग्राहकांना रिकाम्या हाती दुसऱ्या एटीएमची वाट धरावी लागत हाेती. 

दरम्यान, अाज रविवारची सुटी असल्यानेही ग्राहकांना बहुतांश एटीएमला असाच अनुभव ग्राहकांना येऊ शकताे. नाेटबंदीनंतर काही दिवस अशीच स्थिती एटीएममध्ये पाहायला मिळत हाेती, त्यानंतर स्थिती सामान्य झाली अाता पुन्हा एकदा एटीएम रिते हाेत असल्याचे बँकांकडे चलन तुटवडा निर्माण हाेत असल्याचे समाेर येऊ लागले अाहे. स्टेट बँकेने तर दाेन दिवसांपूर्वीच मागणीप्रमाणे रिझर्व्ह बँकेने चलन उपलब्ध करून दिले नाही तर प्रमुख बँकांसह स्टेट बँकेकडेही चलन तुटवडा निर्माण हाेण्याची अशी भीती व्यक्त करण्यात अाली हाेती. 

कॅशलेसवरभर देण्याचे प्रयत्न : नाेटाबंदीनंतरकॅशलेस अर्थव्यवस्थेवर सरकार भर देत अाहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शुक्रवारी नागपूरमध्ये कॅशलेस व्यवहारांवर भर देण्याचे अावाहन जनतेला केले अाहे. स्वच्छ पारदर्शक व्यवहारांकरिता कॅशलेस व्यवहार हे माेठे पाऊल ठरणार असल्याचे सरकारचे म्हणणे अाहे. नागरिकांनी अधिकाधिक कॅशलेस व्यवहारांचा उपयाेग करावा याकरिता ही कृत्रिम चलन टंचाई तयार केली जात असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे अाहे. 

बँकांतराेखता घटू लागली : कर्जावरीलव्याजदर कमी झाल्यावर बँक, पाेस्टातील ठेवींवरील व्याजदरही घटले अाहेत, यामुळे ग्राहकांकडून ठेवी इतरत्र वळविण्यात येत अाहेत. शेअरबाजारातील ट्रेडिंग, म्युच्युअल फंड यांसारख्या हुकमी क्षेत्राकडे ग्राहक वळू लागले अाहेत. यामुळे मात्र बँकांतून राेकड माेठ्या प्रमाणावर जात असली तरी बँकांकडे येणारा पैशांचा अाेघ कमी व्हायला सुरुवात झाली अाहे, यातूनही चलन तुटवड्यासारखे प्रश्न उभे राहायला लागले असल्याचे एका बँक अधिकाऱ्याने सांगितले. 

फक्त पावती येते 
^मी एटीएममध्ये पैसे काढायला गेलो त्यावेळी फक्त पावती बाहेर येते. मात्र कॅश शिल्लक नाही अशा साधा मेसेजसुद्धा येत नाही. केवळ एकाच बँकेत नाही तर सगळीकडे हाच अनुभव आला. राहुलउपासनी, नागरिक. 

१० एटीएम फिरलो 
^पैसे काढण्यासाठी मी तब्बल १० एटीएम फिरलो, मात्र मला कुठेही पैसे मिळाले नाहीत. एटीएममध्ये सुरक्षारक्षकच नसल्याने पैसे का नाहीत? याबाबत माहितीही मिळत नव्हती. आज कोणतेच काम झाले नाही. -सचिन जाधव, कामगार 

अद्याप तक्रारी नाहीत 
^अामच्या नागरीसहकारी बँकांचे एटीएमच नाहीत, राष्ट्रीयीकृत सहकार बँकांशी अाम्ही टायअप केलेले अाहे, त्यामुळे अजून तक्रारी अालेल्या नाहीत. -विश्वास ठाकूर, अध्यक्ष, विश्वास काे-अाॅप.बँक 

काही बँकांत तुटवडा 
^काही बँकांकडे चलन तुटवडा जाणवताे अाहे पण स्टेट बँकेची तशी स्थिती नाही. शहरात अामचे १३६ एटीएम असून २५ काेटी रुपये दरराेज लाेड केले जातात. स्टेट बँकेचे काही माेजके एटीएम बंद असतील तेही तांत्रिक कारणाने. -विशाेक कुमार, महाप्रबंधक, शहर, स्टेट बँक 

मंगळवारी ६० काेटी उपलब्ध हाेतील 
^अाजच्या घडीला अामच्याकडे नाशिक ग्रामीणकरिता ३७ काेटी ५४ लाख रुपये शिल्लक अाहेत, त्यापैकी दरराेज काेटी रुपये एटीएम लाेड करायला लागतात. चलनाची मागणी रिझर्व्ह बँकेकडे नाेंदविली असून, मंगळवारी ६० काेटी रुपये उपलब्ध हाेणार अाहेत. जे शहर शाखा, ट्रेझरी शाखा अाणि अामच्यात विभागले जातील. -सुनील खैरनार, महाप्रबंधक, स्टेट बँक अाॅफ इंडिया, नाशिक ग्रामीण 

सिडको इंदिरानगर भागात नागरिकांना एटीएममध्ये रक्कम मिळत नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला. अनेक कामे करताच आली नाही. 

एटीएममध्ये खडखडाट, ‘कॅशलेस’चा पुन्हा फटका 
सिडको, इंदिरानगर भागात सर्वत्र एटीएममध्ये पैशांचा खडखडाट दिसून आला. शनिवारची कामगार वर्गाला सुट्टी असल्याने त्यांना कामे करायची असतात. बाजार खरेदी करावी लागते. मात्र पैसेच मिळत नसल्याने नागरिक हतबल झाले होते. मोठे व्यवहार कॅशलेस होत असले तरी छोट्या व्यवहारांसाठी रोख रक्कम लागत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अचानकपणे बाजारात आलेली पैशांची टंचाई नागरिकासांठी डोकेदुखी ठरत आहे. 

सकाळपासूनच एटीएममध्ये पैसे मिळत नव्हते. हा प्रश्न केवळ छोट्या बँकेच्या बाबतीत नव्हता तर राष्ट्रीय बँकेच्या एटीएममध्येही पैसे मिळत नव्हते. अचानक आलेली टंचाई नागरिकांच्या पथ्यावर पडली. शिवाय पैसे कधी मिळणार किंवा मिळत नाही याबाबत कुठेही माहिती मिळत नव्हती. शनिवारी काही बँका लवकर बंद होत असल्याने दुपारी पैसे काढणाऱ्यांपुढे संकटच उभे राहिले. 
 
मंगळवारी स्टेट बँकेला ६० काेटी रुपयांचे चलन उपलब्ध हाेण्याची शक्यता, ग्राहकात संताप 
अशी अाहे एटीएमची स्थिती : शहरातराष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, सहकारी बँका यांची ३०० एटीएम अाहेत तर जिल्ह्यात ९१३ एटीएम अाहेत. यापैकी स्टेट बँकेची सर्वाधिक २०१ एटीएम असून, शहरात २५ काेटी तर ग्रामीण भागात काेटी रुपये एकट्या स्टेट बँकेकडून दरराेज एटीएमकरिता वापरले जातात. स्टेट बँकेचे एटीएम नाेटबंदीनंतरही सुरू हाेते, तसेच ते अाजही अाहेत. बाेटावर माेजण्याइतकी एटीएम मात्र तांत्रिक कारणाने बंद असल्याचे िदसून अाले. 
बातम्या आणखी आहेत...