आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामकुंडावरील बांधकामे विराेध झुगारून जमीनदाेस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या रामकुंड परिसरातील बांधकामे हटविण्यासंदर्भातील अतिक्रमण निर्मूलन माेहिमेवर अाक्षेप घेत पुराेहित संघाने विराेध केल्याने चांगलाच वाद पेटला. पथकाने विराेध झुगारून बांधकामे उद‌्ध्वस्त केल्यानंतर पुराेहित संघाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेविराेधात निदर्शने करीत ठिय्या अांदाेलनही केले. कार्यालयाचे बांधकाम काढताना पदाधिकाऱ्यांनी विराेध सुरू केल्यावर पाेलिसांना हलकासा बळाचा वापर करून अांदाेलकांना बाजूला करावे लागले.

गेल्या काही दिवसांपासून रामकुंड परिसरातील अनधिकृत टपऱ्या, बांधकामे काढण्यासाठी पालिका अतिक्रमण निर्मूलन माेहीम राबवणार हाेती. माेहिमेपूर्वी स्थानिक विक्रेते तसेच पुराेहित संघाच्या पदाधिकाऱ्यांनाही कल्पना देण्यात अाली. त्यानुसार पुराेहित संघाने पत्र्याचे शेड काढून घेण्याचे कामही सुरू केले हाेते. दरम्यान, साेमवारी सकाळी १०.३० वाजता अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने जेसीबी अन्य साहित्याद्वारे बांधकाम काढून घेण्यास सुरुवात केली. यावेळी पुराेहित संघाचे पदाधिकारी सतीश शुक्ल यांनी त्यास अाक्षेप घेत स्वत:हून पत्र्याचे शेड काढून घेत असल्याने कारवाई करू नका, थाेडासा अवधी द्या, अशी मागणी केली. मात्र, यापूर्वीच मुदत दिल्याचे कारण देत वेळेत काम झाल्यामुळे अतिक्रमण हटविण्यात अाले. ते हाेत नाही ताेच पुराेहित संघाच्या कार्यालयावर माेर्चा वळवल्यावर मात्र पदाधिकारी अाक्रमक झाले. संबंधित जागेचा ताबा पुराेहित संघाकडे असून, त्याची कागदपत्रे देताे, ताेपर्यंत अतिक्रमण काढू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मात्र, पथकाने सरळ जेसीबीद्वारे कारवाई सुरू केली. विराेध म्हणून पदाधिकारी कार्यालयात घुसले. मात्र, पथकाने कारवाई सुरू ठेवल्यावर काही पदाधिकारी बाहेर अाले, तर काहींना हटविण्यासाठी पाेलिसांना बळाचा वापर करावा लागला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी ठिय्या अांदाेलन करीत पालिकेच्या विराेधात घाेषणा दिल्यवा/ दरम्यान, महापाैर अशाेक मुर्तडक स्थानिक नगरसेवक तथा मनसे महानगरप्रमुख राहुल ढिकले यांनीही सकाळी फिरून अतिक्रमणे काढून घेण्याचे अावाहन केले. सकाळी १० वाजेपासून सायंकाळी वाजेपर्यंत माेहीम सुरू हाेती.

२३पुराेहित जखमी झाल्याचा दावा दरम्यान,सतीश शुक्ल पुराेहित संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी महापाैर अशाेक मुर्तडक, उपमहापाैर गुरमित बग्गा यांची भेट घेतली. यावेळी शुक्ल यांनी पुराेहित संघाला अडचणीत अाणण्यासाठी एका षडयंत्राचा भाग म्हणून कारवाई झाल्याचा अाराेप केला. त्यात २३ पुराेहित जखमी झाले असून, एका ज्येष्ठ पुराेहितांची प्रकृती गंभीर असल्याचाही दावा त्यांनी केला. पालिकेने नाेटीस देता अन्यायकारकपणे कारवाई केली असून, संबंधित अधिकाऱ्यांविराेधात कारवाईची मागणीही त्यांनी केली.

पाेलिस-पालिकेतच वाद सकाळीवाजता माेहीम सुरू करण्याचा निराेप असल्याने पंचवटी पाेलिसांचा फाैजफाटा निरीक्षक शांताराम अवसरे यांच्यासह हजर हाेता. मात्र, पालिकेचे कर्मचारी हजर नसल्याने अवसरेंनी सहअायुक्त साेमनाथ वाडेकर यांच्याशी संपर्क साधून नाराजी व्यक्त केल्याचे समजते. दुसरीकडे येथील विभागीय कार्यालयाचे कर्मचारी सहकार्य करीत नसल्याची खंत विभागीय अधिकारी ए. पी. वाघ यांच्याकडे वाडेकर यांनी व्यक्त केली. शाहीस्नानानंतरच्या परतीच्या मार्गावरील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय झाला. प्रत्यक्षात परतीचा मार्ग काेणता याविषयी अधिकारीच संभ्रमात असल्याचे चित्र हाेते. यंत्रणांमधील असमन्वय हा चर्चेचा विषय ठरला.

सूडबुद्धीने कारवाई
शेडबाबत१९३७ मधील कागदपत्रे असून, त्यात पुराेहित संघाचे कार्यालयाकडे ताबा असल्याचे सिद्ध हाेते. पथकाला वारंवार सांगून त्यांनी संधी दिली नाही. पत्र्याचे शेडही काढून घेत असताना जेसीबी फिरवला. त्यात काही पुराेहित तसेच भाविकही जखमी झाले. सूडबुद्धीने कारवाई झाली अाहे. सतीशशुक्ल, अध्यक्ष, गंगा-गाेदावरी मंदिर पंचकाेटी, पुराेहित संघ

समज देणार
अतिक्रमणनिर्मूलन पथकाबाबत पुराेहित संघाच्या तक्रारींचे निराकारण केले जाणार असून, यापुढे अतिक्रमण निर्मूलन विभागाला माेहीम राबवण्यापूर्वी संबंधितांना सूचना देण्याविषयी समज दिली जाईल. काेणाचे नुकसान करण्याचा महापालिकेचा हेतू नसून सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना साेयीच्या दृष्टीने अतिक्रमणे काढण्यात अाली अाहेत. अशाेक मुर्तडक, महापाैर