आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन ट्रक साहित्य जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेविरोधात भारतीय जनता कामगार महासंघ संलग्न जिल्हा फेरीवाला व टपरीधारक संघटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता मोर्चा काढणार आहे.

महापौर अँड. यतिन वाघ यांनी बुधवारी पाहणी करून दोन दिवसांत अतिक्रमण मोहीम राबवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर गुरुवारी सकाळी फेरीवाले, टपरीधारकांची बैठक शहराध्यक्ष सय्यद युनूस यांच्या अध्यक्षतेखाली मुक्तिधाम येथील कार्यालयात होऊन मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस कोषाध्यक्ष दत्ता वावधने यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

अतिक्रमण पथकाची बैठक
मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण निर्मूलन पथकाची बैठक शुक्रवारी राजीव गांधी भवनात होणार असून, मोहीम शनिवारी की सोमवारी राबवणे यासह त्याचे नियोजन, पोलिस बंदोबस्ताबाबत निर्णय घेणार असल्याचे अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक एस. टी. कारवाल यांनी सांगितले.

महापौरांच्या आदेशानंतर..
महापौर अँड. यतिन वाघ यांच्या आदेशानंतर पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मुख्य रस्ते, चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण होणारे व रस्त्यालगतच्या बिटको रुग्णालय व मुक्तिधाम परिसरात मोहीम राबवून जवळपास तीन ट्रक साहित्य जप्त केले. त्यात भाजीपाला, सहा हातगाड्या, रसवंती मशीन, टेबल-खुच्र्या आदी साहित्य त्यात होते.

दोन वेळा टळली कारवाई
रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणार्‍या जेलरोडच्या सुमारे सव्वाशे टपर्‍या हटविण्याची कारवाई पोलिस बंदोबस्ताअभावी दोन वेळा पुढे ढकलावी लागली होती.

शनिवारी राबवणार मोहीम
शनिवारी मोहीम राबविली जाणार असल्याने अतिक्रमणविरोधी पथकाने शहरात उद्घोषणेद्वारे व्यावसायिकांना गुरुवारी अतिक्रमण हटवण्यासंबंधी आवाहन केले.

येथे आहे अतिक्रमण
मुक्तिधाम चौक, बिटको रुग्णालयासमोरील रस्ता, देवी चौक, सुभाषरोड, वॉस्को चौक, बिटको चौक परिसर, उड्डाणपुलाखालील भाजी विक्रेते, मशीदरोडसह मुख्य रस्ते, चौकात अतिक्रमण आहे. नगरसेवक प्रत्येक प्रभाग समितीच्या बैठकीत प्रशासनास धारेवर धरतात, मात्र कारवाई झाली नाही. महापौरांच्या आदेशानंतर शहर अतिक्रमणमुक्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पालिकेचा एकतर्फी निर्णय
केंद्र,राज्य शासनाने फेरीवाल्याकरीता समिती स्थापन करुन फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्याचे सांगितले असताना पालिकेकडून शासन नियमांचे उल्लंघन करून एकतर्फी निर्णय घेतला आहे.याविरोधात पालिका कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. सय्यद युनूस, भारतीय जनता कामगार महासंघ