आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोका मार्गावरील अतिक्रमणे हटविली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक - अशोकामार्ग, फेम चित्रपटगृहाशेजारील परिसरात गुरुवारी (दि. १३) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या पूर्व विभाग अतिक्रमण निर्मूलन विभागाने अतिक्रमण िनर्मूलन मोहीम राबवली. या मोहिमेत रस्त्यावरील अनधिकृतपणे उभारलेले बॅनर, टपऱ्या, पत्र्याचे शेड तसेच वाहतुकीला अडचणीच्या ठरणाऱ्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या टपऱ्याही जप्त करण्यात आल्या.

अशोका मार्ग परिसरातील रस्त्यावर अनधिकृतपणे फलक, बॅनर तसेच दुकाने मांडत अतिक्रमण करण्यात आले होते. या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अथडळा निर्माण होत वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी अतिक्रमण विभागाने रस्त्यावर अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत कारवाईत होर्डिंग, बॅनर तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हातगाड्या, पानटपऱ्या जप्त करण्यात आल्या. अतिक्रमण निर्मूलन विभागाने केलेल्या कारवाईने या परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. या कारवाईत पूर्व विभागीय अधिकारी मालिनी शिरसाठ, सहायक अधीक्षक जी. जे. गवळी, संजय पगार यांच्यासह अधिकारी पोलिस कर्मचारी सहभागी होते. तसेच, अतिक्रमण विभागातर्फे पाच ट्रकसह २० ते २५ कर्मचारी मोहिमेत सहभागी होते.

विक्रेत्यांची धावपळ
महापालिकेच्याअतिक्रमण निर्मूलन विभागाने अचानक मोहीम राबवली. रस्त्यावर थाटलेल्या छोट्या व्यावसायिकांच्या हातगाड्या, टपऱ्या यावेळी जप्त करण्यात येत होत्या. त्यामुळे आपल्या वस्तू वाचविण्यासाठी विक्रेत्यांची एकच धावपळ सुरू होती.