आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टपरीचालकाच्या पाठपुराव्याने पाडले ‘जैस्वाल’चे अतिक्रमण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जैस्वाल मंगल कार्यालयाच्या आवारातील टपरी हटवण्यासाठी मनपाकडे तक्रार केली. मात्र टपरी अधिकृत असल्याने टपरीचालकाने उलट तक्रार देऊन पाठपुरावा करत जैस्वाल यांचेच बांधकाम अनधिकृत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे महानगरपालिकेने जैस्वाल यांना नोटीस देऊन तब्बल चार महिन्यांनी शुक्रवारी अनधिकृत असलेला जैस्वाल मंगल कार्यालयाचामजला आणि तळमजल्याच्या १५ बाय ६० फूट अतिक्रमणावर हातोडा मारला.
टीव्ही सेंटर येथील आदर्श विद्यानिकेतन सोसायटी, एन-९, हडकोतील जैस्वाल मंगल कार्यालयाच्या एकाच इमारतीत हॉस्पिटलही सुरू केले आहे. मंगल कार्यालयाचा केवळ एक मजला आणि तळमजल्यावर पार्किंग बांधकामास मंजुरी आहे. परिसरात टपरी टाकून एक बेरोजगार पोटाची खळगी भरत होता. मात्र जैस्वाल यांनी मनपाकडे टपरीचालकाची तक्रार करून टपरी हटवण्याची मागणी केली. मात्र मनपाच्या चौकशीत टपरीधारकांकडे नियमित कागदपत्रे आणि करपावत्याही आढळल्या. त्यानंतर टपरीचालकाने जैस्वाल मंगल कार्यालयाविषयी तक्रार केली. त्यानुसार मनपा प्रशासनाने जानेवारीत केलेल्या पाहणीत दोन हजार फुटांपेक्षा जास्त बांधकाम केलेला एक मजला, त्यावर पुन्हा तीन रूमचे बांधकाम आणि तळघरात १५ बाय ६० फुटांचे अनधिकृत बांधकाम केल्याचे दिसून आले. त्यामुळे ११ जानेवारी २०१६ रोजी संबंधितास प्रथम नोटीस दिली. समाधानकारक खुलासा केल्याने महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५३, नुसार नोटीस म्हणजेच जोडपत्र सहा दिले. त्यानंतरही नगर रचना विभागाकडे नकाशाव्यतिरिक्त बांधकामाबाबत दुरुस्ती प्रस्ताव दिला नाही. त्यामुळे नगर रचना विभागाने बांधकाम काढण्यासाठी अभिप्राय दिला. त्यानुसार विनापरवानगी बांधलेल्या आरसीसीच्या १५ बाय ६० फुटांच्या पाच रुम, ३० बाय ३० चे किचन आणि मंगल कार्यालयाचा एक मजला शुक्रवारी पाडण्यात आला. मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या आदेशानुसार उपायुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी एस. एस. कुलकर्णी, नगर रचना विभागाचे कनिष्ठ अभियंता कारभारी घुगे आणि इमारत निरीक्षक सय्यद जमशीद यांच्यासह अतिक्रमण हटाव पथकाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

अधिकारी आले अन्् फोटो काढून गेले
उपायुक्त रवींद्र निकम यांनी अतिक्रमण पाडत असलेल्या ठिकाणी भेट दिली. थोडी पाहणी करून त्यांनी कर्मचाऱ्यांना फोटो काढण्यास सांगितले. फोटो काढून लगेच परतीचा मार्ग धरला. त्यानंतर काढलेले फोटो विविध ग्रुपवरही टाकण्यात आल्याचे दिसत होते.
पार्किंगमध्ये खानावळ
जैस्वालमंगल कार्यालयात वरच्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम करून जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तळमजल्यावर पार्किंग असतानाही तेथे फरशी, फॅन, ट्यूबलाइट, हात धुण्याची जागा, किचन, भांडे धुण्याची सुविधा तयार केली.

कळवायला हवे होते
वॉर्डात मोठी कारवाई करत असताना नगरसेवकाला माहिती द्यायला हवी होती. या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद््भवला असता तर मोठी अडचण झाली असती तर नगरसेवकाला माहिती दिली असती. त्यामुळे अगोदरच माहिती द्यायला हवी होती. नितीन चित्ते, नगरसेवक, पवननगर
बातम्या आणखी आहेत...