आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणांमुळे अावळला जाताेय ‘द्वारका’वर वाहतूक काेंडीचा फास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील मध्यवर्ती भाग अन‌् शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या द्वारका परिसरात फाेफावलेल्या अतिक्रमणांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यामुळे अगाेदरच वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेल्या या चाैकाचा फास अधिक अावळला जात अाहे. छोट्या-मोठ्या अपघातांची तर मालिकाच सुरू असून, तास‌न‌् तास काेंडीचे चित्र नित्याचेच झाले अाहे. यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने येथील अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अशी मागणी प्रवासी वर्गातून हाेत अाहे. त्याचबराेबर वाहतूक पाेलिसांनी परिसरातील बेशिस्त पार्किंगवरही कारवाई करावी, अशी मागणी हाेत अाहे. 
 
शहराचे प्रवेशद्वार असलेल्या द्वारका परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतरही कायमच आहे. रोजच या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. या ठिकाणाहून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना राेजच जीव धाेक्यात घालावा लागताे. परिसरात थाटण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे अधिकच भर पडतो. थेट वर्दळीच्या रस्त्यावर अतिक्रमण थाटण्यात अाल्याने रस्ता नक्की कोणासाठी असा प्रश्न पडताे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका पोलिसांच्या वतीने मोहीमही राबविण्यात आली. मात्र, अधिकारी, कर्मचाऱ्यांची पाठ फिरताच परिसरातील अतिक्रमण जैसे थेच हाेते. परिणामी येथील समस्याही जैसे थेच अाहे. अतिक्रमण हटविण्याबाबत महापालिकेने ठोस पावले उचलणे गरजेचे बनले अाहे. 
 
कारवाईत दिरंगाई... 
महापालिकेच्याअतिक्रमणनिर्मूलन पथकाकडून कारवाईत दिरंगाई हाेत असल्याने बेशिस्तपणे विक्रेते बस्तान मांडतात. त्यांच्याकडे येणारे ग्राहक अापली वाहने भर रस्त्यात पार्क करतात, त्यामुळे काेंडी हाेते. वाहतूक पाेलिसही सातत्याने कारवाई करीत नसल्याने बेशिस्त वाहनचालक काेंडीत भर घालतात. त्यामुळे या चाैकातील वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर बनला अाहे. 
- भूषण विसपुते, वाहनचालक 
 
अनधिकृत रिक्षाथांबे, बेशिस्त पार्किंगमुळे समस्येत भर 
द्वारकापरिसरात अनधिकृत रिक्षाथांबे अाणि बेशिस्त पार्किंग या दाेन गाेष्टींमुळेदेखील वाहतूक काेंडीत माेठी भर पडते. प्रवासी मिळविण्यासाठी थेट रस्त्यावरच रिक्षा उभ्या केल्या जातात. या प्रकारामुळे वाहतूक कोंडी हाेऊन रस्ता सुरक्षितता धाेक्यात येते. वाहतूक पोलिसांनी अशा अनधिकृत रिक्षाथांब्यांविरोधात, तसेच बेशिस्त पार्किंगविराेधात कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...