नाशिक - सिडकाेने ३९८ हेक्टर जागेवर टप्प्याटप्प्याने अंदाजे २५ हजार घरांची निर्मिती केली अाहे. या जागेवर प्लाॅटसह सिडकाेच्या मिळकतीची संख्या ३० ते ३५ हजारांच्या अासपास अाहे. घरांची निर्मिती करताना प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी सुसज्ज चाैक माेठमाेठ्या रस्त्यांची साेय केलेली हाेती. तसेच, ज्येष्ठांसह लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानांची जागा अारक्षित केली हाेती. सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न साकार करतानाच त्यांना राेजगार मिळावा, यासाठी सिडकाेच्या वतीने राबविण्यात अालेल्या सहाही याेजनांमध्ये व्यावसायिक संकुलाची निर्मितीही करण्यात अालेली अाहे. मात्र, दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अतिक्रमणांमुळे सिडकाेला बकाल स्वरूप प्राप्त हाेत अाहे.
कारवाईचा विसर; रस्तेही झाले अरुंद
सिडकाेतीलत्रिमूर्ती चाैक ते उत्तमनगर, त्रिमूर्ती चाैक ते पाथर्डी गाव, त्रिमूर्ती चाैक ते डीजीपीनगर, शिवाजी चाैक, लेखानगर अशा सर्वच भागांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर हाॅटेल व्यावसायिकांसह हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनी बस्तान मांडले अाहे. त्यामुळे हे रस्ते अधिकच अरुंद झाल्याने दरराेज सायंकाळी वाहनधारकांना वाहतूक काेंडीचा सामना करावा लागताे. रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांवर निद्रितावस्थेतील प्रशासनाएेवजी वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात येत असल्याचे दिसून येते. वाहतूक काेंडी फाेडण्याच्या या प्रयत्नाचे नागरिकांकडून स्वागतही केले जात अाहे. याच कारवाईत सिडकाे प्रशासनानेही हातभार लावल्यास अतिक्रमणे उद्््ध्वस्त हाेण्यास वेळ लागणार नाही, अशा प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केल्या.
अनेक व्यावसायिकांनी थाटली सिडकाेतील मुख्य रस्त्यालगत अतिक्रमणे
सिडकाे परिसरातील मुख्य रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या गाळेधारक हातगाडीधारकांनी मुख्य रस्तेच व्यापले अाहेत. या परिसरातील बहुतांश ठिकाणी हाॅटेल व्यवसाय करणाऱ्यांचे स्टाॅल्स बिनदिक्कतपणे रस्त्यावरच लावले जातात. त्यामुळे नागरिकांना तसेच, वाहनधारकांना मार्गक्रमण करताना माेठ्या त्रासाचा सामना करावा लागताे. या संदर्भात सिडकाे प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही उपयाेग हाेत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी ‘डी. बी. स्टार’कडे केल्या अाहेत. परिणामी, गेल्या कित्येक वर्षांपासून या परिसरातील अतिक्रमणाचा विळखा अधिक घट्ट हाेत असून, नागरिकांना अनेक गैरसाेयींना सामाेरे जावे लागत अाहे.
अतिक्रमणधारकांनी केली स्वतंत्र ड्रेनेज लाइन तयार
^सिडकाेच्या मुख्यरस्त्यालगत असलेल्या गाळेधारकांनी सिडकाे प्रशासनाची काेणत्याही प्रकारची परवानगी घेता स्वतंत्र ड्रेनेज लाइन तयार केली अाहे. तांत्रिकदृष्ट्या अयाेग्य असलेल्या या ड्रेनेज लाइन नेहमीच चाेकअप हाेऊन दूषित पाणी बाहेर येत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत अाहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही उपयाेग हाेत नसल्याचा अाराेप स्थानिक नागरिक करीत अाहेत. - अशाेक माेहीम, स्थानिकरहिवासी
सिडकाे प्रशासनाने केलेले रेड मार्किंग कागदावरच
अतिक्रमणांच्या वाढत्या तक्रारींवरून सिडकाे प्रशासनाच्या वतीने अतिक्रमित बांधकामांना गेल्या काही दिवसांपूर्वी रेड मार्किंग करण्यात अाले हाेते. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांच्या उरात धडकी भरली हाेती. मात्र, प्रशासनाच्या वतीने करण्यात अालेली ही रेड मार्किंग कारवाई अाजपर्यंत फक्त कागदाेपत्रीच ठरली अाहे.
गल्लाेगल्ली अतिक्रमण
सिडकाेप्रशासनाने ते याेजनांच्या माध्यमातून रहिवासी सदनिका काही प्रमाणात व्यावसायिक गाळ्यांची निर्मिती केली अाहे. मात्र, या सर्वच याेजनांना अतिक्रमणांचे ग्रहण लागले अाहे. सदनिकाधारकांनी जागेच्या हव्यासापाेटी अतिक्रमण करून जागा व्यापण्याचे काम केल्याने अापाेअापच सुमारे मीटर रस्ता असलेल्या गल्ल्या चिवट हाेत चालल्या अाहेत. त्यामुळे या गल्ल्यांमधून दुचाकी घेऊन फिरणेदेखील मुश्कील हाेऊन बसले अाहे.
माहिती अधिकारात नागरिकांपुढे अनेक बाबी झाल्या उघड
वैशाख सेक्टर च्या पाटीलनगर येथील नागरिकांनी सिडकाे प्रशासनाला माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारलेल्या अनेक प्रश्नांमुळे सिडकाेतील बहुतांश कामे अनधिकृतच असल्याचे उघड झाले अाहे. महात्मा फुले शाॅपिंग सेंटरमधील शाॅप नंबर ते १५ या गाळ्यांच्या पाठीमागील बाजूस अाणि गाळ्यांच्या वर झालेली हाेत असलेली बांधकामे काढण्याची मागणी करण्यात अाली अाहे. या गाळ्यांना ड्रेनेजला परवानगी दिलेली नसतानाही या ठिकाणी पाठीमागील बाजूने ड्रेनेज लाइनदेखील टाकण्यात अाली असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली अाहे. कांचन बाेधले, प्रशासक,सिडकाे
कायदेशीर नाेटिसा बजावणार
सर्वसामान्यांना परवडणारी घरे देऊन शहराचा विकास साधणाऱ्या सिडकाेतील सर्वच याेजना अाजघडीला अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्या अाहेत. गृहनिर्माण याेजना अाखताना सिडकाे प्रशासनाने काॅलनीसह मुख्य रस्तेही प्रशस्त दिलेले हाेते. मात्र, अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस हे रस्ते अरुंद हाेत चालले असून, कारवाईसाठी सिडकाे प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळच नसल्याने समस्येत वाढ हाेत असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून येत अाहे. सिडकाेच्या प्रशासकांनी अतिक्रमणविराेधी माेहीम राबविण्याचा निर्णय घेतला असला, तरी यासाठी त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट चित्र अाहे. प्रशासनासाठी डाेकेदुखी नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या या प्रकारावर ‘डी. बी. स्टार’च्या माध्यमातून टाकलेला हा प्रकाशझाेत...
थेट प्रश्न
{ सिडकाेच्या सर्वच याेजनांमध्ये माेठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे यात दिवसेंदिवस वाढच हाेत अाहे. अापल्या विभागाकडून ठाेस कारवाई का केली जात नाही?
-सिडकाेतील अतिक्रमित भागांचा अाम्ही अभ्यास करीत असून, हे अतिक्रमण काढण्यासाठी विशेष याेजना अाखत अाहाेत.
{ सिडकाे प्रशासनानेच रेड मार्किंग केलेली अतिक्रमणे अद्याप का काढली नाहीत?
-अामच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याने महापालिका पाेलिस प्रशासनाची मदत घेऊन प्रभावीपणे अतिक्रमण निर्मूलन माेहीम राबविण्यात येईल.
{ वैशाखसेक्टर वी स्कीम पाटीलनगर येथील अतिक्रमणाबाबत लेखी तक्रार करूनही कारवाई का केली जात नाही?
-अामच्याकडे तक्रार अाल्यानंतर मी माझ्या अधिकाऱ्यांनी दाेन वेळा त्या ठिकाणी भेट दिली. तेथे सुरू असलेल्या बांधकामांबाबतची माहिती मागविण्यात अाली अाहे.
{ परंतु इतर अतिक्रमणधारकांना अभय का?
-अाम्ही कुणालाही अभय दिले नसून, अतिक्रमण करणाऱ्यांना कायदेशीर नाेटीस बजावणार अाहाेत.