आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबड भागात चार अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - शहरातीलअनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास महापालिकेने प्रारंभ केला असून, मंगळवारी (दि. ८) अंबड भागातील चार धार्मिक स्थळे हटविण्यात अाली. सुरुवातीला भाविक प्रशासनात यावरून वाद झाला. मात्र, नंतर मोहीम शांततेत पार पडली. शहरातील धार्मिक स्थळांवर अशा प्रकारची ही पहिलीच माेठी कारवाई अाहे.
सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कार्यवाही सुरू केली अाहे. यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. महापालिकेने या माेहिमेची सुरुवात सिडको विभागातून केली आहे. अंबड भागातील धार्मिक स्थळांशी संबंधित असलेल्यांना प्रशासनाने नोटीस दिली हाेती. मात्र, यात स्वयंस्फूर्तीने फक्त एकच अतिक्रमण काढण्यात आले.

केवल पार्क, अंबड येथील गणपती मंदिर भाविकांनी स्वतःच काढले. अंबड लिंकरोडवरील दत्त मंदिर काढताना माजी सभागृहनेते दिलीप दातीर इतर नागरिकांनी विरोध केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिस दंडाधिकाऱ्यांनी कायदेशीर बाब समजावून सांगितल्याने तेथील विरोध मावळला. त्यामुळे सर्वच भागातील मोहीम शांततेत पार पडली. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त आर. एम. बहिरम, विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत, आर. आर. गोसावी, सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सुभाष डवले, अविनाश सोनवणे, संजय बांबळे यांच्यासह सर्व मुख्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांमध्येधडकी मंगळवारीसकाळीच अतिक्रमण निर्मूलन मोहिमेची सुरुवात करण्यात आली. पोलिस बंदोबस्त, पोलिसांच्या १५ वाहनांचा ताफा, त्यानंतर महापालिकेची वाहने, जेसीबी मशीन, ट्रक कर्मचारी असा संपूर्ण फौजफाटा रस्त्याने मोहिमेवर निघाला. हा सर्व प्रकार पाहून नागरिकांमध्ये धडकी भरली.

ज्या ज्या ठिकाणी ही मोहीम राबविली गेली त्या ठिकाणीही विरोध करण्यास कुणी पुढे आले नाही. प्रशासनाने ठरविले तर काय होऊ शकते याची अनुभूती नागरिकांनी घेतली. यानंतर आता कुणावर कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही अतिक्रमणे हटविली
गणपती मंदिर, केवळ पार्क, अंबड
पीरबाबा दर्गा, जाधव संकुल, अंबड-चुंचाळे
दत्त मंदिर, अंबड लिंकरोड
महादेव मंदिर, कारगिलनगर, अंबड
अंबड लिंक रोड येथील दत्त मंदिराचे अतिक्रमण हटविताना वाद झाला. याबाबत माजी सभागृहनेते दिलीप दातीर यांनी प्रशासनाला जाब विचारला. या ठिकाणी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविले
^प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत अंबड भागातील चार धार्मिक स्थळे हटविण्यात आली. त्यांना रीतसर नोटीस देण्यात आली होती. इतरही ठिकाणी कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. -डॉ. सुनीता कुमावत, विभागीय अधिकारी.

कायदेशीर कारवाई करण्यात आली
^न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने अतिक्रमण मोहीम राबवली. त्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडला नाही. शांततेत मोहीम पार पडली. -अतुल झेंडे, सहाय्यक आयुक्त.
बातम्या आणखी आहेत...