आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रविवार कारंजा, मेनराेडवरील अतिक्रमणांवर पोलिस बंदोबस्तात हाताेडा; साहित्य जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राष्ट्रीय फेरीवाला धाेरणाची अंमलबजावणी करण्यापूर्वी लिटमस टेस्ट म्हणून जुन्या रहदारीची रस्ते चाैकातील अतिक्रमण हटवण्याची माेहीम महापालिकेने हाती घेतली असून, मंगळवारी सकाळी रविवार कारंजा मेनराेड परिसरात महापालिका पाेलिसांच्या माेहिमेत सात टेम्पाे साहित्य जप्त करण्यात अाले. विशेष म्हणजे, पूर्वसूचना देताच कारवाई झाल्याचा अाराेप करीत विक्रेत्यांनी विराेध सुरू केल्यावर महापालिका पाेलिसांनी ताेडीस ताेड उत्तर देत अतिक्रमण काढून टाकले. या कारवाईमुळे बऱ्याच वेळ तणावाचे वातावरण हाेते.
सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात अाली हाेती. मात्र रस्त्यावर विक्री करणाऱ्या हातगाडीवाल्यांसह किरकाेळ विक्रेत्यांवर कारवाई केली नव्हती. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, राष्ट्रीय फेरीवाला धाेरणानुसार विक्रेत्यांसाठी फेरीवाला झाेन तयार करण्याचे काम सुरू हाेते. नुकतेच हे काम पुर्ण हाेवून महासभेने विक्रेत्यांसाठी नवीन झाेन तयार केले अाहे. अशा परिस्थीतीत महत्त्वाचे रस्तेही माेकळे करणे गरजेचे असून त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी रविवार कारंजा मेनराेडवरील विक्रेत्यांविराेधात कारवाई करण्यात अाली.

सकाळी १०.०० वाजता अचानक या परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू झाली. यावेळी स्वत: पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पोलिस उपायुक्त विजय पाटील, महापालिकेचे पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात हाेता. रस्त्यावर दुकान मांडलेल्या छोट्या विक्रेत्यांसह थेट रस्त्यापर्यंत बस्तान मांडलेल्या व्यावसायिकाच्या विरोधात कारवाई करत साहित्य जप्त करण्यात आले. रविवार कारंजा येथून सुरू करण्यात आलेली कारवाई सराफ बाजार, मेनरोड, दहिपूल याही ठिकाणी राबविण्यात आली.

या मोहिमेत रस्त्यावरील हातगाड्या, दुकानाबाहेर ठेवण्यात अालेले वस्तू, साहित्य जप्त करण्यात आले. अचानक राबविण्यात आलेल्या या कारवाईने विक्रेत्यांची एकच धावपळ निर्माण झाली होती.

विभागीय अधिकाऱ्यांना घेराव : अचानकझालेल्या कारवाईचा निषेध करत पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेर यांना घेराव घातला. सर्वाच्च न्यालयाच्या निर्णयानुसार पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय विक्रेत्यांवर कारवाई करणे चुकीचे आहे. प्रशासनाकडून न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला जात असल्याच्या तक्रारी यावेळी हॉकर्स, टपरीधारक संघटनेने केल्या.
अतिक्रमण निर्मूलनप्रसंगी मार्गदर्शन करताना पाेलिस अायुक्त डाॅ. सिंघल.
अतिक्रमण हटविल्यानंतर रविवार कारंजा परिसराने असा माेकळा श्वास घेतला.
सर्वाेच्च न्यायालयाच्या अादेशानुसार राष्ट्रीय फेरीवाला धाेरण राबवले जात अाहे. या धाेरणांतर्गत प्रत्येक शहरात फेरीवाला, ना फेरीवाला प्रतिबंधीत फेरीवाला क्षेत्राची निर्मिती करण्यात अाली अाहे. नाशिक महापालिका क्षेत्रात दहा हजारांपेक्षा अधिक फेरीवाल्यांची नाेंद असून त्यांच्यासाठी पाचशेहून अधिक फेरीवाला क्षेत्र विकसित झाले अाहेत. फेरीवाला समितीच्या मान्यतेनंतर शहरात विभागनिहाय फेरीवाला क्षेत्राबाबत निश्चित प्रतिबंधित केलेल्या जागांना महासभेची मान्यता घेतल्याचा प्रशासनाचा दावा अाहे. या क्षेत्राची अंमलबजावणी करण्यापुर्वी प्रत्येक विभागातील एक नमुना फेरीवाला क्षेत्र वसवून अडचणी समजून घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न अाहे. प्रत्यक्षात प्रशासनाने फेरीवाला क्षेत्रासाठी ज्या जागांचा विचार केला त्या फेरीवाला समितीने मान्यच केल्या नसल्याचा किंबहुना त्यास विराेध दर्शवल्याचा दावा हाॅकर्स टपरीधारक युनियनने केला अाहे. दुसरीकडे प्रशासनाने फेरीवाला समितीच्या मान्यतेनंतरच महासभेची मान्यता दिल्याचे कारण देत अशाचपद्धतीने प्रत्येकाचा विराेध अाल्यास फेरीवाला क्षेत्र निश्चित हाेणार नाही वाहतुक काेंडीही दूर हाेणार नाही असा पवित्रा घेत अाक्रमक हाेण्याचे संकेत दिले अाहे. रविवार कारंजा परिसरात कायमस्वरूपी अतिक्रमण हटाव माेहीम सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हा काही जेजुरीचा प्रसंग नाही की वास्तवही. मात्र, मंगळवारी मेनरोडवर राबवण्यात आलेल्या अतिक्रमण निर्मूलनादरम्यान पथकातील एका कर्मचाऱ्याने साडी विक्रेत्या दुकानासमोरील मॉडेल अशी थेट उचलून गाडीत ठेवली. महिलेचा पुतळा म्हणजे ‘प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट’ असाच होता, त्यामुळे हा प्रसंग पाठीमागून पाहणाऱ्यांची क्षणभर चांगलीच फसगत झाली.
महापालिकेने मंगळवारी अतिक्रमण निर्मूलन माेहीम राबवली, परंतु शहरातील काही भागात अतिक्रमणांचा विळखा कायम अाहे, यावर डी. बी. स्टारचा प्रकाशझाेत.
बातम्या आणखी आहेत...