आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेसायटी अतिक्रमणेही अाता पालिकेचे लक्ष्य, अतिक्रमणांच्या तक्रारी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- एकीकडे मुख्य रस्त्यावर रेखांकित केलेली अतिक्रमणे हटवण्याकडे दुर्लक्ष हाेत असताना अाता महापालिकेने साेसायटींतर्गत अतिक्रमणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला अाहे. या संदर्भातील तक्रारी वा रहिवाशांमधील वाद थेट मुख्यमंत्र्यांच्या लाेकशाही दिनापर्यंत पाेहचू लागल्याचे बघून अाता नगररचना विभागाकडून प्राप्त झालेल्या जवळपास साडेतीनशे प्रकरणांवर हाताेडा फिरवण्याचा निर्णय घेतला अाहे.
अतिक्रमण काढून घेण्यासाठी संबंधितांना नाेटिसा पाठवल्या असून, साधारण १५ दिवसांनंतर जे अतिक्रमण कायम राहतील त्यांना जमीनदाेस्त करण्याबराेबरच त्याचा खर्चही मिळकतधारकाकडून वसूल केला जाणार अाहे.
शहरात अाजघडीला माेठ्या इमारतींची संख्या माेठी असून, बहुतांश इमारतींमध्ये शेजाऱ्यांमध्ये एकमेकांच्या अतिक्रमणावरून वाद सुरू अाहे. अतिक्रमण काढण्याबाबत महापालिकेकडे महिन्याला साधारण एक हजाराहून अधिक तक्रारी येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. इतक्या माेठ्या संख्येने अालेल्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी नगररचना विभागाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी करतात. त्यानंतर नकाशा वा मंजूर अाराखडा वगळता अन्य अनधिकृत बांधकाम अाढळल्यास ते काढण्याबाबत संबंधितांना नाेटीस िदली जाते. त्यानंतर दखल घेतल्यास संबंधितांना अंतिम नाेटीस बजावून पालिकेमार्फत हटवण्याची प्रक्रिया सुरू हाेते.
अाजघडीला जवळपास शहरातील साडेतीनशे प्रकरणे अतिक्रमण विभागाच्या रडारवर असून, त्यावर अंतिम कारवाई केली जाणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त राेहिदास बहिरम यांनी सांगितले. विभागनिहाय माेहीम हाती घेतली जाणार असून, तत्पूर्वी लाेकांनी अतिक्रमण काढून घेऊन त्याचे छायाचित्रासह पुरावे दाखल केल्यास उर्वरित.पान
अितक्रमणे हटविण्याची माेहीम सुरूच राहाणार
^मुख्य रस्त्यांवरील अनधिकृत अतिक्रमणे काढण्याची मोहीम यापुढेही सुरू राहणार असून, पालिकेने रेखांकित केलेले अतिक्रमणे हटविण्यात येतील. ही मोहीम राबविताना मध्यंतरी नियोजनात थोडा फरक पडला. मात्र, ही मोहीम या पुढेही सुरूच राहील. -डाॅ. प्रवीण गेडाम, अायुक्त

पुरावे दाखवले तर कारवाईतून सूट
अतिक्रमणधारकांवरकारवाईची तयारी पूर्ण झाली अाहे. ज्यांना अंतिम नाेटीस बजावली त्यांनी पंधरवड्यात अतिक्रमण काढून त्याचे छायाचित्र पालिकेला दिले तर त्यांना सूट मिळेल. अन्यथा अतिक्रमण काढण्याचा खर्च वसूल करू. - राेहिदासबहिरम, उपायुक्त,अतिक्रमण निर्मूलन

माेठ्या रस्त्यांवरील कारवाईला ब्रेक
सिंहस्थकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील माेठ्या रस्त्यांना अडथळे ठरणारी अतिक्रमण काढण्याची माेहीम थंडावली अाहे. पाेलिस बंदाेबस्त नसल्याचे कारण त्यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभाग देत अाहे. मध्यंतरी न्यायालयाच्या अादेशानुसार म्हसाेबावाडी येथील झाेपड्यांचे अतिक्रमण हटवले गेले. त्यानंतर मात्र माेठी कारवाई झालेली नाही. माेठ्या रस्त्यावर बहुतांश अतिक्रमणे व्यापारी वर्गाची असून, या पार्श्वभूमीवर काही भाजप अामदारांनी व्हाेट बँकेला धाेका पाेहचण्याची भीती व्यक्त केली हाेती. राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे एलबीटीप्रमाणे उगाच मुख्यमंत्र्यांची खपामर्जी नकाे म्हणूनही प्रशासनानेही दाेन पाऊले मागे घेतल्याचे बाेलले जाते.

अायुक्त परदेश दाैऱ्यावर
पालिकाअायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम हे दाेन दिवसांच्या परदेश दाैऱ्यावर बुधवारी जाण्याची शक्यता अाहे. हा दाैरा अाटाेपून ते शुक्रवारी परतील. त्यानंतर दाेन दिवस सरकारी सु्टी असल्यामुळे १६ फेब्रुवारीला ते पुन्हा सूत्रे स्वीकारतील असेही सांगितले जाते. केंद्र शासनाच्या खर्चातून बँकाॅक येथील कार्यक्रमाला ते हजर राहतील असे सांगितले जाते. दुसरीकडे अायुक्तांचा दाैरा पालिकेच्याच खर्चातून तर नाही ना याचीही माहिती नगरसेवक साेमवारी घेत हाेते.