आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणाच्या विळख्यातून जिल्हा रुग्णालय मुक्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गुरुवारी जिल्हा रुग्णालयाजवळील अतिक्रमणांवर कारवाई केल्याने हा परिसर अतिक्रमण मुक्त झाला आहे. पथकाच्या वतीने दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास ही कारवाई सुरू झाली. त्यात टॅक्सी संघटनेची टपरीही सुटली नाही. संघटनेच्या दहा ते बारा पदाधिकार्‍यांनी टपरी हटविण्यास विरोध दर्शवित स्वत:ला टपरीत कोंडून घेतले. दरम्यान, पोलिसांनी जाळ्या तोडून या सर्वांना बाहेर काढले आणि नंतर ही टपरी हटविण्यात आली. दरम्यान, महापालिकेनेच संघटनेला ही जागा कार्यालयासाठी दिली होती, त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचे संघटनेच्या पदाधिकार्‍यांचे म्हणणे होते. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाची हीच वक्रदृष्टी आता शहरातील पदपथ, प्रमुख रस्ते, वाहनतळे आणि वाहतूक बेटे यांसारख्या परिसरातील इतर अतिक्रमणांवरही पडावी, जेणेकरून नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.