आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण निर्मूलन माेहीम राबवताना भीमवाडीत तणाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंजमाळ येथील भीमवाडीत अतिक्रमण काढण्यासाठी गुरुवारी आलेल्या पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला नागरिकांनी विरोध केल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, विभागीय अधिकारी मालिनी सिरसाठ यांनी राहिवाशांची समजूत घातल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन मोहीम शांततेत पार पडली. चार घरांचे काही अतिक्रमण काढले गेले.

भीमवाडी परिसरात घरकुल योजनेंतर्गत इमारतींचे काम आता अंतिम टप्प्यावर आले असताना परिसरातील नागरिकांनी देण्यात आलेली पर्यायी जागा खाली करण्याची मोहीम अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे सुरू आहे. गुरुवारी पूर्व विभागातर्फे राबविण्यात आलेल्या या माेहिमेस परिसरातील चार घरातील काही भाग अतिक्रमित असल्यामुळे भीमवाडी परिसरातील सुरू असलेले घरकुल योजनेत अडथळा येत होता. यामुळे या घरातील काही भाग काढण्यात आला. या वेळी काही रहिवाशांनी अतिक्रमण पथकाचा विरोध केला. या वेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता. विभागीय अधिकारी मालिनी सिरसाठ यांनी अतिक्रमणधारकांशी चर्चा करून संबंधितांना समजून सांगितल्यानंतर अतिक्रमण काढण्यास त्यांनी परवानगी दिली. दरम्यान, मुंबईनाका, नागजी परिसरात करण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेनंतर त्या भागात पुन्हा अतिक्रमणात वाढ होत असल्याने त्या भागात पुन्हा मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अतिक्रमणामुळे अडथळे...
भीमवाडी परिसरात नागरिकांना दिलेल्या घरांव्यतिरिक्त काही अतिक्रमण करण्यात आले हाेते. यामुळे घरकुलाच्या कामात अडथळा येत होता. ही अतिक्रमणे गुरुवारी काढण्यात आली. ही मोहीम शांततेत पार पडली. -मालिनी सिरसाठ, विभागीय अधिकारी, पूर्व विभाग
बातम्या आणखी आहेत...