आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणांवर पडणार महापालिकेचा हातोडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहरातील अनधिकृत तसेच अतिक्रमण करणारी बांधकामे काढण्याची ताकीद दिल्यानंतर पालिकेची संबंधित यंत्रणा कामाला लागली आहे. त्यानुसार अंतिम कारणे दाखवा नोटिस बजावलेल्या सर्वच अतिक्रमणांवर हातोडा पडणार आहे.

अतिक्रमण निर्मुलन आणि नगररचना विभागाने अतिक्रमणांची विभागनिहाय यादी तयार केली आहे. अतिक्रमण निर्मुलन विभागाकडे कर्मचारी संख्या अपूर्ण असल्याने एक-एक विभागातील अतिक्रमणे काढली जाणार असल्याचे महापौर अँड. यतिन वाघ यांनी सांगितले.

फुलबाजार लवकरच स्थलांतरीत : सराफ बाजारातील वाहतूक कोंडी लक्षात घेत तेथील मसाले विक्रेते व फुल बाजार लवकरच स्थलांतरीत केला जाणार आहे. फुल विक्रेत्यांना गणेशवाडीत आयुर्वेद रुग्णालयासमोर तर मसाले विक्रेत्यांना नारोशंकर मंदिरासमोरील जागा दिली जाणार आहे. आज या विक्रेत्यांनी महापौरांची भेट घेतली असता तत्काळ यादी सादर करण्याची सूचना महापौरांनी दिली.

पूररेषेचा ठराव शासनाकडे : दोन वर्ष होऊनही पूररेषेबाबत शासनाकडून निर्णय होत नसल्याने बांधकामांना परवानगी देण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे महापौरांनी सांगितले.