आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण काढल्याने संतापून पालिका कर्मचाऱ्यास मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - संभाजी चौक, उंटवाडीरोड परिसरातील एका नामवंत सराफी दुकानासह महात्मानगर परिसरातील मोना चेंबर्स सोसायटीमधील बांधकामाचे अतिक्रमण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढल्यानंतर एका दुकान मालकाने अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना बुधवारी (िद. १८) घडली.

पश्चिम विभागाच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध बांधकाम अतिक्रमण काढण्याची माेहीम राबविण्यात आली. मोहिमेची सुरुवात संभाजी चौक परिसरातील आर. सी. बाफणा ज्वेलर्स या सराफी दुकानाच्या दाेन्ही बाजूंच्या अवैध बांधकामावर कारवाईने करण्यात अाली. तेथील लोखंडी साहित्य जप्त करण्यात आले. यानंतर महात्मानगर परिसरातील मोना चेंबर्स को- ऑप. सोसायटीजवळील नरेंद्रसिंग बिंद्रा यांच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणावरील अतिक्रमण काढण्यात आल्यानंतर बिंद्रा यांनी मोहिमेला विरोध करून मोहिमेत अडथळा अाणत अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यास मारहाण केली. विभागीय अधिकारी सोनवणे कर्मचाऱ्यांनी गंगापूररोड पोलिस ठाण्यात त्या अाशयाची तक्रार केली अाहे.

अतिक्रमण निर्मूलन पथकाची चार वाहने, जेसीबी ट्रकच्या मदतीने ही कारवाई करण्यात अाली. मोहिमेत अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त जी. जे. गवळी, यू. डी. जाधव, एस. यू. पगार, नगररचनाचे सहायक अभियंता प्रदीप भामरे यांनी सहभाग घेतला.

नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज
^गेल्या काही दिवसांपासून शहरात पुन्हा अतिक्रमण मोहीम राबविण्याची सुरुवात महापालिकेने केली आहे. नोटीस देऊनही अतिक्रमण काढण्यात आलेले नाही. त्यामुळे कारवाई केली जात आहे. कर्मचाऱ्यांना मारहाण करणे चुकीचे आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. जयश्रीसोनवणे, विभागीय अधिकारी, पश्चिम विभाग