आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुठे कारवाई, कुठे साेयीस्कर भूमिका शहरात अद्यापही अतिक्रमणांचा विळखा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या काही दिवसांपासून शहरात महापालिकेच्या वतीने खासगी मिळकतींच्या अतिक्रमणांसह धार्मिकस्थळांवर कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सहाही विभागांत विशेष मोहीम राबविली जात आहे.
दोन महिन्यांपूर्वी शहरातील अनेक बाजारपेठांतील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली. मात्र, दोन महिन्यांतच अाता पुन्हा संबंधित ठिकाणांवर अतिक्रमणधारकांनी बस्तान मांडले असून, पालिकेच्या दुर्लक्षित कारभाराचा फायदा उचलत थेट रस्तेच ताब्यात घेतल्याची धक्कादायक बाब ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर अाली अाहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले तसेच वर्दळीच्या परिसरांपैकी एक असलेल्या सारडा सर्कल, शिंगाडा तलाव, मुंबई नाका, द्वारका शालिमार परिसरातील मुख्य रस्त्यांसह छाेट्या रस्त्यांवरही पुन्हा अतिक्रमण, पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला अाहे. व्यावसायिक, गॅरेजचालक, फिरते विक्रेते यांच्याकडे येणाऱ्या वाहनचालकांना वाहने उभी करण्यासाठी जागाच नसल्याने भररस्त्यातच वाहने उभी केली जातात. परिसरात तासन‌्तास उभ्या राहणाऱ्या या वाहनांमुळे कित्येकदा वाहतुकीचा खाेळंबा हाेऊन वाहनचालकांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे ठरते. अशी परिस्थिती असताना पालिका वा वाहतूक पाेलिस प्रभावी कारवाई करताना मात्र दिसून येत नसल्याने प्रशासनाच्या या साेयीस्कर भूमिकेबद्दल अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे.

भंगार वाहनांची रांगच; कचरा थेट रस्त्यावर
मुंबई नाक्याकडून सारडा सर्कलकडे येणाऱ्या रस्त्यावर अनेक गॅरेजचालकांनी नादुरुस्त वाहने थेट या रस्त्यावरच पार्किंग केल्याने या रस्त्याला ‘भंगार’ स्वरूप प्राप्त झाले अाहे. काही महिन्यांपूर्वीच महापालिकेकडून या भागात कारवाई करत रस्ता मोकळा करण्यात अाला होता. मात्र, पुन्हा गॅरेजचालकांनी अापली भंगार वाहने रस्त्यावर उभी केली आहेत. सारडा सर्कल ते शिंगाडा तलाव या परिसरात राेजच मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती वा अन्य कामांसाठी वाहने येत असतात. या वाहनांची दुरुस्ती थेट रस्त्यावरच हाेते. या दरम्यान प्लास्टिक पिशव्या, रिकामे खाेके, कागद िनकामी पार्ट‌्स थेट रस्त्यावरच टाकले जातात.

वाहतूक पोलिसांचीही बघ्याची भूमिका...
शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहने दुरुस्ती केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघातांची शक्यताही वाढत असल्याने वाहतूक पोलिस विभागाकडून या दुकानदारांना नोटिसा बजावल्या हाेत्या. या नोटिसांकडेही हे दुकानदार दुर्लक्ष करत असून, सर्रासपणे रस्त्यावरच दुरुस्तीची कामे केली जात आहे. या वाहनांवर वाहतूक पोलिसांनीही कारवाई करणे गरजेचे असताना त्यांचेही या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.
शिंगाडा तलाव, मुंबई नाका परिसरात बँक, शाळा, एसटीचे कार्यालय, हाॅस्पिटल, हाॅटेल्स यांसह अग्निशमन दलाचे कार्यालय असतानाही पालिका तसेच वाहतूक पाेलिस प्रशासनालाही या परिसरात कारवाई करण्याचा िवसर पडत असल्याने अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे. िवशेष म्हणजे, येथील अनेक व्यावसायिक, विक्रेते, गॅरेजचालकांना वाहतूक पाेलिसांनी नाेटिसा बजावल्या असतानादेखील या नोटिसांकडे दुर्लक्षच केले जात आहे.

फूटपाथांवरही अतिक्रमणे फाेफावली...
शहरातील विविध भागांत फूटपाथांवरही अतिक्रमणे फाेफावली असल्याचे ‘डी.बी. स्टार’ने केलेल्या पाहणीत समाेर अाले अाहे. या विक्रेत्यांवर किरकाेळ कारवाई झाली, तरी ते पुन्हा अल्पावधीतच या ठिकाणी अापले बस्तान मांडत असल्याचेही दिसून अाले अाहे. प्रशासनाकडून फाैजदारी कारवाई केली जात नसल्याने केवळ चिरीमिरीवर साेयीस्करपणे कारवाई केली जात असल्याने ही परिस्थिती गेल्या कित्येक महिन्यांपासून ‘जैसे थे’च अाहे.
महापालिकेकडून कारवाईचा देखावा...
महापालिका विभागाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाईचा देखावा करत केवळ छोट्या व्यावसायिकांवर साेयीने कारवाई केली जाते. मात्र, शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शालिमार, मुंबई नाका, सारडा सर्कल, शिंगाडा तलाव द्वारका परिसरातील काही व्यावसायिकांच्या अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कडक कारवाई केली जात नसल्यामुळे ती दिवसेंदिवस वाढूच लागली अाहेत. या अतिक्रमणांकडे प्रशासनाकडून डोळेझाक का केली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गॅरेजचालकांवरही
कडक कारवाई करू...
^शहरातीलमुंबईनाका, सारडा सर्कल, शिंगाडा तलाव, वडाळा नाका द्वारका भागातील रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांच्या विरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. या भागातील गॅरेजचालकांना नोटिसादेखील बजावण्यात आलेल्या असून, आता त्यांच्यावर मुंबई मोटार वाहन अॅक्ट कायद्याविरोधात कठाेर कारवाई केली जाणार आहे. जेणेकरून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांचा प्रश्न मार्गी लागू शकेल अाणि काेंडी फुटण्यातही यश मिळेल. -जयंत बजबळे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा, नाशिक
नव्याने प्रस्ताव सादर केला अाहे
कुठे कारवाई, कुठे साेयीस्कर भूमिका
शहरात अद्यापही अतिक्रमणांचा विळखा
{गॅरेजचालक, हाॅटेल, दुुकानांसमाेरील माेठी अतिक्रमणे दुर्लक्षितच
{धार्मिकस्थळे, किरकाेळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने शहरातील रस्त्यात अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली अाहे. यात धार्मिकस्थळांवरही कारवाई केली जात अाहे. मात्र, प्रत्यक्षात शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या सारडा सर्कल, शिंगाडा तलाव, मुंबई नाका, द्वारका शालिमार परिसरात व्यावसायिकांच्या दुकानांसमाेरील अतिक्रमणे, भररस्त्यात उभी राहणारी वाहने, गॅरेजचालकांचे अतिक्रमण, अाॅनराेड विक्रेते यांच्यावर दंडात्मक कारवाईकडे मात्र साेयीस्करपणे दुर्लक्षच केले जात असल्याचे चित्र ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले अाहे. पालिका प्रशासनाच्या या साेयीस्कर भूमिकेमुळे या अतिक्रमणांत मोठ्या प्रमाणावर वाढ हाेत असून, वाहतुकीचा प्रश्नही गंभीर बनला अाहे. त्यावर हा प्रकाशझाेत...
शिंगाडा तलाव, मुंबई नाका, द्वारका, सारडा सर्कल, शालिमार परिसरातील अतिक्रमणांवर कारवाईची मागणी; प्रशासनाकडून काणाडाेळाच
आर. एम. बहिरम, उपायुक्त,अतिक्रमण विभाग, महापालिका
{ शहरात ठिकठिकाणी वाढलेल्या अतिक्रमणांसंदर्भात काेणती ठाेस पावले अापल्या विभागाकडून उचलली जात आहेत?
-शहरात विविध ठिकाणी वाढत्या अतिक्रमणांविरोधात कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
{सारडा सर्कल ते शिंगाडा तलाव या भागात काही गॅरेजचालकांनी थेट रस्त्यावर गॅरेज थाटले आहेत. त्यामुळे मार्गक्रमणात सतत अडथळे निर्माण हाेत अाहेत. त्यांच्यावर कारवाई का नाही?
-सारडा सर्कल ते शिंगाडा तलाव या भागात गॅरेजच्या अतिक्रमणांवर तसेच, अाॅनराेड अतिक्रमणांवर लवकरच कारवाई केली जाईल.
{अापण अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविलेल्या काही भागांत अाता पुन्हा अतिक्रमण फाेफावले आहे. त्याचे काय?
-मंगळवारी शहरातील अनेक ठिकाणी अतिक्रमणांवर हाताेडा मारण्याची मोहीम राबविण्यात आली आहे. अाता पुढील कारवाई यापूर्वी मोहीम झालेल्या ठिकाणी राबविण्यात येणार आहे. त्यात पुन्हा उभारण्यात अालेल्या अतिक्रमणांवर अधिक कठाेर कारवाई करू. जेणेकरून पुन्हा अतिक्रमण हाेणार नाही.
बातम्या आणखी आहेत...