आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील ऊर्जा संवर्धकांची कामगिरी सातासमुद्रापार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ऊर्जासंवर्धनासाठी काम करणाऱ्या विज्ञान भारती या संस्थेद्वारे नाशिकच्या अमित कुलकर्णीने केलेला ऊर्जा संवर्धनाचा प्रकल्प अमेरिकेतील एमआयटीत सादर झाला. भारतातून ‘शिफ्टिंग अॅटिट्यूड्स अँड बिहेवियर’ या स्पर्धेसाठी गेलेला हा एकमेव प्रकल्प असून, जगभरातील ७० प्रकल्पांत ‘पॉप्युलर चॉइस अवाॅर्ड’ पटकावणारा हा प्रकल्प ठरला. याच प्रकल्पाला विशेष पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

२०१२ मध्ये सुरू केलेला हा प्रकल्प, आज २१ राज्यांमध्ये सुरू असून, त्याचा मुख्य उद्देश लाख शालेय विद्यार्थ्यांची ऊर्जारक्षक म्हणून तुकडी तयार करण्याचा आहे. त्या माध्यमातून तब्बल १०० लाख युनिट वीज आणि लाख ४१ हजार ५०० किलो वॉट अवर ऊर्जा संवर्धनाचा मानस आहे. हा आकडा पाहता सामान्य माणसासाठी तीन पिढ्यांची वीज आणि ऊर्जा संवर्धन होईल. या प्रकल्पांतर्गत मुख्यत्वे ऊर्जा संवर्धनासाठी लाख ऊर्जारक्षक तयार करणे, ग्रीन स्टार - ऊर्जा बचत करणाऱ्या शाळांना मानांकन प्रदान करणे यांसारखी कामे केली जाणार आहेत.

एकत्रितरीत्या या कार्यक्रमाला ‘ऊर्जा वाहिनी’ म्हटले गेले आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा कार्यकाळ ऑगस्ट २०१५ ते मार्च २०१८ आहे. या प्रकल्पाची संकल्पना अमितची आहे. याशिवाय निड (नॅशनल एन्व्हायर्नमेंट एनर्जी डेव्हलपमेंट) या कार्यक्रमाचा तो राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम पाहतो. अागामी १० वर्षे या प्रकल्पाचे काम सुरू राहाणार असून, त्याचे पहिले टप्पे पूर्ण झाले आहेत.

प्रकल्पाचीही आहे सद्यस्थिती
ऊर्जा संवर्धनाचा हा प्रकल्प देशातील २१ राज्यांमध्ये कार्यरत असून याअंतर्गत दक्षिण भारतात २५० शाळा, उत्तर भारतात २२० , मध्य भारतात ३५० शाळा, पूर्व आणि पश्चिम भारतात अनुक्रमे ९० आणि ४५ शाळांमध्ये काम सुरू आहे. एकूण ९५ हजार ५०० विद्यार्थी ऊर्जारक्षक म्हणून तयार केले आहेत.

राज्यातील सुरुवात नाशिकमध्ये
या कामाची महाराष्ट्रातील सुरुवात येत्या शैक्षणिक वर्षापासून नाशिकमध्येच होणार आहे. नाशिकच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे ऊर्जारक्षक म्हणून परिवर्तन करणार आहेत. त्यांना ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धनाची शिकवण दिली जाईल.

शहरातऊर्जा संवर्धन कार्यक्रम
विज्ञान भारती आणि निड मिशनद्वारे शहरात ऊर्जा संवर्धकांना विशेष पुरस्कारांनी गौरविले जाणार आहे. यासाठी अमितसह तरुणांची धडपड सुरू आहे. त्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध ऊर्जाविषयक स्पर्धा, घरगुती वीज वापरासाठी ऊर्जा संवर्धन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

शाळाकरते लाखांची बचत..
नाशिकच्या मानवधन संस्थेच्या धनलक्ष्मी शाळेत मुलांना मूल्यशिक्षणात ऊर्जा बचतीचे धडे दिले जातात. त्यात प्रत्येकास घरात नैसर्गिक स्त्रोतांचा वापर, पर्यावरण संवर्धन, वीज कमी वापरण्याची शिकवण दिली जाते. घरात गरज नसेल तेथे दिवे बंद करावेत, वीज उपकरणांचा योग्य वापर करावा अशा लहान सवयींमधून प्रत्येक घरात किमान १०० रुपयांची बचत लाइट बिलांत होऊ लागली. अशा प्रकारे धनलक्ष्मी शाळेतील विद्यार्थी तब्बल ते लाख रुपये महिन्याला बचत करतात. नाशिकमध्ये हे काम करणारी ही एकमेव शाळा असल्याची माहिती शाळेचे संचालक प्रकाश कोल्हे यांनी दिली.

फ्लाइंग ऑफिसरची भरारी
नाशिकमधील निवृत्त फ्लाइंग ऑफिसर ऊर्जा बचतीसाठी कार्यरत आहेत. रमेश पाटील यांनी घरातील वीज उपकरणे सोडून ऊर्जा बचतीचा संदेश दिला. फ्रीजसारखे जास्त वीज खाणारे उपकरण गरज असल्यास वापरा, नैसर्गिक उजेड, सौरऊर्जा वापरा अशी शिकवण ते परिसरात देतात. ते काम करत असलेल्या मुलांच्या वसतिगृहाचीही वीज ते वाचवतात. वीज बचतीने ते महिन्याला सुमारे २०० ते ३०० रुपयांचा खर्च वाचवतात आणि इतरांनाही प्रवृत्त केल्याने आता लाखो रुपयांची बचत होत आहे.

बातम्या आणखी आहेत...