आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्तावित वीज दरवाढीस तीव्र विराेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वीजिनयामक अायाेगाच्या मंगळवारी (दि. ९) मुंबईत हाेणाऱ्या सुनावणीत प्रस्तावित २५ ते ३५ टक्के वीज दरवाढीला कडाडून विराेध करण्याचा निर्णय संबंधित सामाजिक संस्था, संघटना यांनी घेतला अाहे. याचबराेबर त्यांचे अांदाेलनही सुरू अाहे.
मुंबईत वीज नियामक अायाेगाच्या बैठकीस उपस्थित राहून त्यास विराेध करण्याचा पवित्रा स्वीकारण्यात अाला अाहे. महानिर्मिती कंपनीने मार्च २०१३ अखेरच्या तुटीपाेटी २६१५ काेटी रुपये महसुलाची उणीव दाखवली अाहे. त्या पार्श्वभूमीवर २५ ते ३५ टक्के नवीन दरवाढीची मागणी वीज नियामक अायाेगाकडे केली अाहे. याबाबत नागरिकांचे म्हणणे एेकून घेण्यासाठी मंगळवारी (दि. ९) सुनावणीचे अायाेजन करण्यात अाले अाहे. हा प्रस्तावित वीजदर अन्य सार्वजनिक खासगी वीजपुरवठा दरापेक्षा सव्वा ते दीड रुपये प्रतियुनिट महागणार अाहे.
थकबाकी वसुली हाच सर्वाेत्तम पर्याय

-वीजदरवाढीबाबतचा निर्णय घेऊन ती सामान्य अाणि मध्यमवर्गीयांच्या खिशातून वसूल करणे सर्वात साेपे असते. त्यामुळे ताेच पर्याय अवलंबण्याचा वीजनिर्मिती कंपनीचा डाव दिसताे. मात्र, त्यापेक्षा थकबाकी वसूल करणे हाच सर्वाेत्तम पर्याय असून, त्याचा प्राधान्य क्रमाने विचार केल्यास इतक्या माेठ्या प्रमाणात दरवाढ करावी लागणार नाही. प्रस्तावित दरवाढीला ग्राहक पंचायतीच्या वतीने कडाडून विराेधच केला जाईल. प्रा.दिलीप फडके , अध्यक्ष,मध्य महाराष्ट्र प्रांत, ग्राहक पंचायत
-वीज दरवाढीचा निर्णय असाे की अन्य काही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असाे, अायाेगाच्या बैठका जिल्हास्तरावरच घ्यायला हव्यात. त्यामुळे प्रथम अायाेगाने अशी तरतूद करायला हवी. - अतुलपेठकर, नागरिक
-खरेतर ही बैठक नागपूर अधिवेशनानंतरच घ्यायला हवी हाेती. मात्र, वीज नियामक अायाेग माेठा की सरकार हाच अाता प्रश्न अाहे. मेजरपी. एम. भगत, ग्राहकपंचायत संघटनमंत्री
विदेशात गळती चाेरी टक्के, भारतात २० टक्के!
-विदेशातविजेच्या चाेरी अाणि गळतीचे प्रमाण अवघे टक्के असते. तर, भारतात हेच प्रमाण तब्बल २० टक्के किंवा त्याहून अधिक अाहे. अॅड.श्रीधर व्यवहारे, अधिकृतग्राहक प्रतिनिधी, राज्य वीज नियामक अायाेग