आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्‍याची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - के. के. वाघ अभियांत्रिकीच्या प्रॉडक्शन शाखेच्या एका विद्यार्थ्याने मुलांच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (दि. 2) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

हॉस्टेलच्या खोली क्रमांक 303 मध्ये आयुष राजेश हजारे (वय 21) याने बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी रेक्टर जगन्नाथ जाधव यांनी नेहमीप्रमाणे मुलांना उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आयुषच्या खोलीतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून आत पाहिले असता, आयुष पंख्याला लटकलेला

आढळला. आडगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, शनिवारी प्रॉडक्शन विषयाचा पेपर देऊन तो परतला होता. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.