आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकीचे पहिल्या फेरीतील प्रवेश सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाची अंतिम गुणवत्ता यादी बुधवारी (दि. २२) जाहीर करण्यात आली असून, यामुळे आता एआरसी सेंटरद्वारे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘फ्रीझ, स्लाइड, फ्लोट’ पद्धतीद्वारे ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश घेता येईल.
अभियांत्रिकीसाठी नाशिक विभागात १७ हजार २७० विद्यार्थ्यांचे अर्ज निश्चित झाले आहेत. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जांमध्ये २१ जूनपर्यंत दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली होती. नाशिक विभागात अभियांत्रिकी पदवीची ४९ महाविद्यालये असून, आतापर्यंत १७२७० विद्यार्थ्यांचे अर्ज निश्चित झाले आहेत.

प्रवेशप्रक्रिया अशी...
२५ जूनपर्यंत : पहिल्यातीन फेऱ्यांसाठी पसंतीक्रम नोंद. (ऑप्शन फॉर्म)
२७ जून : पहिल्याफेरीसाठी जागावाटप.
२८ जून ते जुलै : एआरसीसेंटरवर जाऊन प्रवेश. (फ्रीझ, स्लाइड किंवा फ्लोटचा पर्याय)
जुलै: दुसऱ्याफेरीसाठी जागावाटप.
ते१२ जुलै : एआरसीसेंटरवर जाऊन प्रवेश.
१४ जुलै : तिसऱ्याफेरीसाठी जागावाटप.
१५ ते १८ जुलै : प्रवेशस्वीकारणे.
२० जुलै : चौथ्याफेरीसाठी रिक्त जागांची माहिती सादर करणे.
२१ ते २४ जुलै : चौथ्याफेरीसाठी नव्याने पसंतीक्रम भरता येईल.
बातम्या आणखी आहेत...