आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभियांत्रिकी प्रवेशासाठी पुन्हा ‘सीईटी’चाच पर्याय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाराष्ट्रराज्य उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातर्फे घेण्यात येणारी अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा, म्हणजेच सीईटी परीक्षा २०१६ या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. जेईई या सीबीएसइ बोर्डाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या बदल्यात ही परीक्षा होईल. या शैक्षणिक वर्षात जेईईसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाल्याने हा बदल पुढील शैक्षणिक वर्षापासून अमलात येणार आहे.

पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याविषयीची प्रवेश पात्रता, परीक्षेचे वेळापत्रक आणि संपूर्ण माहिती लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सीबीएसइतर्फे घेण्यात येणाऱ्या जेईईचा अभ्यासक्रम तुलनेने अवघड आणि त्याहीपेक्षा या परीक्षेच्या तयारीचा खर्च जास्त होता. आता महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रथम वर्षासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. शेवटची सीईटी २०१३ मध्ये झाली होती. यानंतर महाराष्ट्रातही जेईई देण्याची सक्ती केली गेली होती.

सीईटी परीक्षेच्या अधिकृत तारखांची माहिती संकेतस्थळांवर दाखल झाल्यानंतर राज्यातील महाविद्यालयांसाठी सक्तीची केलेली जेईई परीक्षा बंद करण्यात येणार आहे. सीईटी परीक्षेचे स्वरूप पाहता पूर्वीप्रमाणे या परीक्षेतदेखील विद्यार्थ्यांना ५० टक्के गुण बारावीचे, तर ५० टक्के गुण सीईटीचे ग्राह्य धरले जाणार आहेत.