आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभियांत्रिकी पदवीच्या 2200 अर्जांची विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विविध विद्याशाखांतील प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली असून, अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षासाठी सोमवारी 2200 विद्यार्थ्यांनी एआरसी सेंटरच्या माध्यमातून अर्ज खरेदी केले आहेत. शहरातील प्रमुख चार महाविद्यालयांमध्ये अ‍ॅप्लिकेशन किट खरेदी करून अनेक विद्यार्थ्यांनी अर्जही भरले आहेत.

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे 2014-15 साठी जाहीर केलेल्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेनुसार खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 700, तर मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये शुल्क अर्जासाठी आकारण्यात येत आहे. अर्ज खरेदीसाठी विद्यार्थ्यांची एआरसी सेंटरवर गर्दी झाली होती.

अशी होईल अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया : 23 जून ते 3 जुलैदरम्यान आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. 5 जुलै रोजी कॅप राउंडसाठी ‘प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट’ जाहीर होईल. त्यानंतर 6 ते 8 जुलैदरम्यान कागदपत्रांची पडताळणी होईल. 9 जुलैला अंतिम गुणवत्ता जादी जाहीर होणार असून, त्यानंतर प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होईल.
डिप्लोमा प्रवेशप्रक्रिया 27 पासून
अभियांत्रिकी पदविकेसाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना 27 जून ते 6 जुलैपर्यंत एआरसी सेंटरच्या माध्यमातून आॅनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज खरेदी करून एआरसी सेंटरच्या माध्यमातून तो विहित मुदतीत भरणे आवश्यक आहे. 7 जुलैला गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, त्यानंतर 8 ते 10 जुलै या कालावधीत कागदपत्रांची पडताळणी होईल. त्यानंतर 12 जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, त्यानंतर तीन राउंडमध्ये प्रवेशप्रक्रिया पार पडणार आहे.