आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकी परीक्षा जुन्या वेळापत्रकानुसार, विविध विद्याशाखांच्या परीक्षा मेपासून सुरू हाेणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभियांत्रिकी शाखेच्या लेखी परीक्षा यंदा लवकर घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, विद्यार्थी संघटनांकडून जुन्या वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा घेण्याची मागणी झाल्यानंतर विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षा ठरल्यानुसार मेपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट करत अधिकृत वेळापत्रकही उपलब्ध केले आहे.
अभियांत्रिकीच्या परीक्षा २६ एप्रिलपासून सुरू होणार असल्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असल्याचे पत्र सोशल मीडियावर फिरत आहे. परीक्षा लवकर घेण्याच्या मागणीची दखल घेत परीक्षा मंडळाच्या बैठकीत अभियांत्रिकीच्या परीक्षा मेऐवजी २६ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले. मात्र, विद्यापीठाकडून बदल झालेले वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध झाल्याने परीक्षार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परीक्षा लवकर घेण्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह अनेक विद्यार्थ्यांनीही विरोध केल्यानंतर पुणे विद्यापीठाने जुन्या वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या परीक्षा अाता मेपासून सुरू होतील.
निर्णयाने शैक्षणिक नुकसान टळेल
अभियांत्रिकीच्या परीक्षा वेळापत्रकात ऐनवेळी बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता वाढली होती. तसेच, विद्यापीठाचे माैखिक प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजनही कोलमडणार असल्याने विद्यापीठाने जुन्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे संभाव्य शैक्षणिक नुकसान टळू शकेल.