आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Engineering Students Exam Issue At Nashik, Divya Marathi

पुनर्तपासणी निकालाविनाच अभियांत्रिकीच्या परीक्षा सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पुढील परीक्षेपूर्वीच कुठल्याही स्थितीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी देण्यासह पुनर्तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे बीसीयुडीचे संचालक तथा परीक्षा नियंत्रक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांचे आश्वासन अवघ्या पाच दिवसांतच पोकळ ठरले आहे. कारण अध्र्याहून कमी विद्यार्थ्यांना ऐनवेळी फोटोकॉपी मिळाल्या, तर इतरांना त्या मिळाल्याच नसल्याने पुनर्तपासणीविना पूर्वीच्या पेपरची चांगली उत्तरे लिहिली असतानाही केवळ विद्यापीठाच्या चुकीमुळेच पुन्हा परीक्षा द्यावी लागत असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी थेट विद्यापीठाला दंड करण्याची इच्छा व्यक्त केली.
अभियांत्रिकीच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा 5 मेपासून सुरूझाल्या आहेत. मात्र, मागील सत्रातील परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे अद्याप पुनर्तपासणीच्या निकालाची प्रक्रियाच पूर्ण झाली नाही. प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या 2008 आणि 2012 या दोन पॅटर्नच्या परीक्षा होतात. पैकी केवळ 2012 च्या पॅटर्नच्याच विद्यार्थ्यांना अर्थात डॉ. गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार केवळ 50 महाविद्यालयांच्या फोटोकॉपी विद्यापीठाने पाठविल्या खर्‍या, पण त्याही परीक्षेच्या तीन दिवस आधीच. मिळालेली फोटोकॉपी विद्यार्थ्यांनी आपल्या विभागप्रमुखांकडून तपासून घेतल्यानंतर गुणवाढीसाठी विद्यापीठात केलेला फेरतपासणीच्या अर्जाचा निकालच अद्याप लागली नाही. 5 मे रोजी प्रथम वर्षाचा मॅथेमॅटिक्स-1 या विषयाचा पेपर झाला. तो सर्वच विद्यार्थ्यांना द्यावा लागला. त्यामुळे या फोटोकॉपीचा उपयोगच झाला नसल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत.
वेळ पडल्यास न्यायालयात जाणार
445 दिवसांत परीक्षांचे निकाल न लावल्यास विद्यापीठालाही दंड व्हायला हवा, असे नाव न सांगण्याच्या अटीवर काही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. आम्ही आता ही मागणी करणार आहोत. वेळ पडल्यास विद्यार्थी हितासाठी न्यायालयातही जाऊ. अजिंक्य गिते, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष, मनविसे
हेळसांड