आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकीत परीक्षेचे वारे, ‘सबमिशन’साठी सुरू झाली विद्यार्थ्यांची धावपळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अभियांत्रिकी महाविद्यालयांत ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांची ‘सबमिशन’साठी धावपळ सुरू झाली आहे. ऑनलाइन परीक्षांच्या गोंधळानंतर विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेची तयारी व्यवस्थित करता यावी, यासाठी महाविद्यालयीन वार्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

ऑक्टोबरमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रात्यक्षिक परीक्षा व अंतर्गत गुणांसाठी ‘सबमिशन’ सुरू झाले आहे. 15 ऑक्टोबरपासून सगळ्या अभियांत्रिकी विभागांच्या प्रात्यक्षिक परीक्षा व 11 नोव्हेंबरपासून लेखी परीक्षा सुरू होतील. या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अर्धेअधिक गुण मिळाले नाहीत, हे गुण भरून काढण्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा आणि अंतर्गत गुणांसाठी होणार्‍या ‘सबमिशन’मध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागणार आहेत. 50 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहून अभ्यास केल्यास चांगले गुण हमखास मिळतील, असे महाविद्यालयीन प्रशासनाकडून सांगण्यात आले. परीक्षेसंबंधीच्या माहितीसाठी www.unipune.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे कळविण्यात आले आहे.