आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदरशांमध्ये इंग्रजीचे धडे, २२१ शाळाबाह्य मुलांसाठी शिक्षण मंडळाचा पवित्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरात अाढळलेल्या एक हजार शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात अाणण्यासाठी महापालिका शिक्षण मंडळाला चांगलीच कसरत करावी लागत असून, या माेहिमेत अाढळलेली २२१ मुले मदरशांमध्ये शिक्षण घेत असल्यामुळे तेथेच जाऊन इंग्रजी, विज्ञान गणिताचे धडे देण्याची तयारी पालिकेने केली अाहे.
महापालिका शिक्षण मंडळाने राज्य शासनाच्या अादेशानुसार जुलै राेजी महापालिका क्षेत्रात शाळाबाह्य मुले शाेधण्यासाठी सर्वेक्षण केले होते. सुमारे पाच हजार प्रगणक या माेहिमेत सहभागी झाले हाेते. माेहिमेत १,०५७ मुले शाळाबाह्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यातील ३७९ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात अाणण्यासाठी शिक्षण मंडळाला यश अाले. तर, २२१ मुले मदरशांमध्ये शिक्षण घेत असल्यामुळे महापालिकेचे शिक्षक तेथेच जाऊन त्यांना महत्त्वाचे विषय शिकवतील. याव्यतिरिक्त ८० मुले स्थलांतरित हाेत असल्यामुळे त्यांचा पत्ता लागला नाही. ५१ मुले विकलांग असून, त्यांच्या हालचालींवर बंधने येत असल्यामुळे माेबाइल टीचर नेमून ते घराेघरी जाऊन शिकविणार अाहेत. याव्यतिरिक्त १४ मुलांचे वय अाठवी इयत्तेसाठी अावश्यक मर्यादेपुढे गेल्यामुळे त्यांच्याबाबतही शिक्षण मंडळाला काहीच करता अालेले नाही.
तीन हजार विद्यार्थिनींना ‘नन्ही कली’चा हात
महापालिकेच्या१६ शाळा चार अाश्रमशाळांमध्ये नांदी फाउंडेशनमार्फत ‘नन्ही कली’ हा शैक्षणिक उपक्रम राबवला जात असून, चालू वर्षी हजार ८३ विद्यार्थिनींना या उपक्रमांतर्गत चांगल्या शैक्षणिक सुविधा विशेष शिक्षणाचा लाभ मिळणार अाहे. पालिका शिक्षण मंडळाने नुकतीच संबंधित संस्थेच्या उपक्रमाला मान्यता दिली अाहे. यात विद्यार्थिनींचा शैक्षणिक विकास करण्यासाठी पालक भेटी, वस्ती भेटी, कार्यशाळा, पूर्व तसेच अंतिम चाचण्या घेतल्या जाणार अाहेत. काही निवडक शाळांमध्ये वाचनालय प्रकल्प राबवला जाणार अाहे. गणेशाेत्सव, दिवाळी, उन्हाळी सुटी अन्य सुटीच्या दिवसांत अशा विद्यार्थ्यांचे विनामूल्य विशेष वर्गही घेतले जाणार अाहेत.