आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर न भरणार्‍यांचे कनेक्शन बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - करमणूक कर न भरणार्‍या शहरातील 40 केबलचालकांचे फोर टू बी परवाने रद्द होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने कर भरण्यासाठी निर्वाणीचा इशारा दिला असतानाही या केबलचालकांनी न्यायालय किंवा जिल्हा प्रशासनाकडे शुक्रवार(दि. 27)पर्यंत करभरणा न केल्याने ही कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमुळे नियमित केबलचालकांना पैसे मोजणार्‍या शहरातील किमान दहा हजार ग्राहकांचे टीव्ही संच बंद पडणार आहेत.

केबलचालकांनी करमणूक कर भरणा करावा, याकरिता प्रशासनाकडून शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची मुदत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. मात्र, किमान चाळीस ऑपरेटर्सनी या मुदतीत न्यायालयात किंवा जिल्हा प्रशासनाकडे करभरणा केलेला नाही. दरम्यान, 127 पैकी 87 केबल ऑपरेटर्सनी करभरणा केला आहे. त्यापैकी 40 लाखांचा भरणा न्यायालयात, तर एक कोटी 12 लाख रुपयांचा भरणा जिल्हाधिकारी कार्यालयात केबल ऑपरेटर्सनी केला आहे.

ग्राहकांनी ऑपरेटर्सला जाब विचारावा
ज्या प्रामाणिक ग्राहकांनी आपल्या केबल ऑपरेटरला पैसे दिले आहेत; पण त्याने करभरणा केलेला नसेल तर परवाना रद्द झाल्यानंतर त्याचा फटका थेट ग्राहकांना बसणार आहे. याबाबत विचारले असता, ग्राहकांची अडचण होणार असली तरी कारवाई करावीच लागणार असून, ग्राहकांनी आपल्या केबल ऑपरेटरला कर भरण्याबाबत विचारायला हवे, असे आवाहन पाटील यांनी केले.

एमएसओऐवजी केबल ऑपरेटर्सला दणका
कर भरण्याप्रकरणी एमएसओंवरच कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाची होती. मात्र, केबल ऑपरेटर्सच्या संघटनेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयात कर भरणा करण्याचे मान्य केले होते. यामुळे आता या याचिकेच्या निर्णयानुसारच कर भरणा न केलेल्या केबल ऑपरेटर्सला कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी स्पष्ट केले.