आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एमबीए'साठी ऑगस्टला होणार पुन्हा प्रवेश परीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मास्टर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार असून, असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ एमबीए, एमएमएम इन्स्टिट्यूट (एएमएमआय) या संस्थेच्या वतीने ऑगस्ट २०१५ रोजी प्रवेशपरीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे.
तंत्रशिक्षण संचलनालयाच्या प्रवेश परीक्षेनंतर एएमएमआय संस्थेला प्रवेश परीक्षा घेण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच परवानगी दिली होती. त्यानुसार या संस्थेच्या वतीने प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे एमबीएसाठी १४ १५ मार्च रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. या प्रवेश परीक्षेस विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. परंतु, त्यावेळी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा संधी मिळणार असून, शैक्षणिक वर्ष २०१५ २०१६ साठी "एएमएमआय-सीईटी' ही एमबीएसाठीची प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. प्रवेश परीक्षेस शासनाकडून परवानगी मिळाली असून, असोसिएशनच्या http://www.mahaammi.com या संकेतस्थळावर वेळापत्रक दिले आहे.

तंत्रशिक्षण संचलनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा देता येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ खेडकर यांनी केले आहे.
रिक्त तसेच संस्था स्तरावरील जागा भरणार
तंत्रशिक्षणसंचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून, लवकरच त्याची प्रवेश प्रक्रिया होईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या तसेच संस्था स्तरावरील जागा भरण्यासाठी असोसिएशन ऑफ मॅनेजमेंटतर्फे परीक्षा घेतली जाणार असून, त्यानंतर या जागा भरल्या जातील. अधिक माहितीसाठी www.mahaammi.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा. एमबीए अभ्यासक्रमाची शहरात २४ महाविद्यालये असून, त्यात एकूण १२२४ जागा उपलब्ध आहेत. रिक्त जागांसाठी तसेच संस्थात्मक स्तरावरील जागांसाठी ही प्रवेश परीक्षा हाेईल.
अशी होणार परीक्षा...
तारीख प्रवेश प्रक्रिया
मे ते ३० जुलै २०१५ संकेतस्थळावर प्रवेश अर्ज उपलब्ध
३० जुलै २०१५ प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत
ऑगस्ट २०१५ प्रवेश परीक्षा
ऑगस्ट २०१५ परीक्षेचा निकाल होणार जाहीर
१४ ऑगस्ट २०१५ प्रवेशसाठीची अंतिम मुदत
(टीप - प्रवेश परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची होणार असून, त्यासाठी १०० प्रश्न असतील. २०० गुणांसाठी परीक्षा होणार आहे.)
बातम्या आणखी आहेत...