आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्मार्ट सिटी’साठी उद्योजकांचे साकडे, अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधानांना सादर करणार अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक रोड- देशातील २० शहरांना जाहीर झालेल्या इंडियाज माेस्ट प्राॅमिसिंग सिटी पुरस्कारासाठी नाशिकची निवड झाली असताना देशातील १०० स्मार्ट सिटीत नाशिकची निवड हाेण्यासाठी शहरातील तज्ज्ञ प्रयत्न करीत अाहेत. केंद्राने जुलै २०१४ मध्ये सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात देशात १०० स्मार्ट सिटी निर्माण करण्याची घाेषणा केली. त्यानुसार प्रशासकीय स्तरावर १०० ‘स्मार्ट सिटीं’साठी शहरांच्या निवडीची प्रक्रिया सुरू अाहे. तज्ज्ञांनी शहरातील वैशिष्ट्यांचा सविस्तर अहवाल तयार केला असून, अर्थसंकल्प सादर हाेण्यापूर्वी पंतप्रधानांना अहवाल सादर करून साकडे घातले जाणार अाहे.
माेठ्या महानगरासाठी पूरक मध्यम अाकाराची साधारणत: २० लाख लाेकसंख्येचे सॅटेलाइट टाउन अशी स्मार्ट सिटीची संकल्पना अाहे. अस्तित्वातील शहरांचे चांगले नियाेजन करून चांगल्या सुविधा, शहराचा कायापालट करण्याची ही याेजना अाहे. अांतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा, स्वस्त जलद दळणवळण, पर्यावरण समताेल राखणारे नियाेजन, जीवनमान उंचावेल अशी अाराेग्य व्यवस्था, मुबलक पाणी, वाय-फाय अादी सुविधा नाशिकला यातून मिळतील. नाशिक शहराच्या वैशिष्ट्यांचा अहवाल वास्तुविशारद उन्मेष गायधनी, माजी खासदार प्रतापदादा साेनवणे, मविप्र सभापती अॅड. नितीन ठाकरे यांच्यासह काही संस्था, तज्ज्ञांनी तयार केला अाहे.
त्यात स्वच्छ हवा, मुबलक शुद्ध पाणी, कुशल कामगार, शैक्षणिक संस्थांची मांंदियाळी, मुंबई-पुणे-सुरत-अाैरंगाबाद नजीक, अाेझर विमानतळामुळे देशातील प्रमुख शहरांशी हाेणारा संभाव्य हवाई संपर्क, कृषी क्षेत्रातील द्राक्षांची महत्त्वाची बाजारपेठ, कुंभमेळ्याचे महत्त्वाचे स्थान, शिर्डी, त्र्यंबकेश्वर, सप्तशंृगगडावर जाण्यासाठी भाविकांना एकमेव साेयीचे शहर, नव्याने विकसित हाेणाऱ्या पर्यटनामुळे उत्पन्नात वाढ, वाइन कॅपिटल म्हणून ख्याती अादी मुद्यांचा अहवालात समावेश अाहे. यामुळे नाशिकची निवड १०० स्मार्ट सिटींत हाेण्यासाठी प्रयत्न केले जात अाहेत.
...त्यानुसार नियोजन
राजीवगांधी सरकारने १०० माॅडेल सिटी तयार करण्याची याेजना अाणली हाेती. त्यात राज्यातून केवळ नाशिक अाणि अाैरंगाबादचा समावेश हाेता. त्या संकल्पनेनुसार नाशिकचे नियाेजन सुरू अाहे.
सविस्तर अहवाल तयार
नाशिकचा १०० ‘स्मार्ट सिटीं’त समावेशासाठी सविस्तर अहवाल तयार केला अाहे. पुढच्या अाठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वेंकय्या नायडू, अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन पंतप्रधानांना अहवाल सादर करण्यात येणार अाहे. -उन्मेष गायधनी, वास्तुविशारद