आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entrepreneurs Notice Issue Aat Jalgoan, Divy Marathi

वाढीव बांधकामाबद्दल दोनशे उद्योजकांना नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील सुमारे दोनशे उद्योजकांना महापालिका प्रशासनाने वाढीव बांधकामाबाबत नोटीस बजावली आहे. या नोटिसीनुसार करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामापोटी पालिकेने दंडासह घरपट्टी बिलाची आकारणी केल्याने घरपट्टीमध्ये तीन ते चारपट वाढ झाली आहे. यामुळे उद्योजकांचे धाबे दणाणले असून, गुरुवारी यासंदर्भात घेण्यात आलेल्या सुनावणीत उद्योजकांनी मोठय़ा प्रमाणात हरकती नोंदविल्या आहेत.
पालिका प्रशासनाच्या वतीने सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या मंजूर असलेल्या बांधकामाची व त्यानंतर करण्यात आलेल्या बांधकामाची मोजणी करून संबंधितांना अनधिकृत वाढीव बांधकामाची नोटीस बजावण्यात आली. त्यात त्यांना दंडासह विविध करांचा समावेश करून घरपट्टीची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पालिकेच्या सहआयुक्त चेतना केरुडे यांच्या उपस्थितीत सातपूर विभागीय कार्यालयात सुनावणी आयोजित करण्यात आली होती. या वेळी निमाचे मंगेश पाटणकर, राजेंद्र आहिरे, मधुकर ब्राम्‍हणकर, राजकुमार जॉली, छोरीया, राजेश जाधव, धनंजय बेळे आदींनी चुकीची नोटीस बजावण्यात आल्याचे सांगून हरकती नोंदविल्या. त्यानंतर सहआयुक्त व उद्योजकांमध्ये सकारात्मक चर्चा होऊन दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी व नियमानुसार घरपट्टी आकारण्यासाठी आयुक्तांसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचे ठरविण्यात आले.

दरम्यान, उद्योजकांना बजावलेल्या नोटीसच्या अनुषंगाने कागदपत्र सादर करण्यासाठी उद्योजकांना 45 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.