आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वृक्षसंवर्धनासाठी ‘पर्यावरण भिशी’ उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भिशी म्हटलं तर सर्वांनी एकत्र येत पैसे जमा करायचे, ज्याचा नंबर असेल त्यांना द्यायचे.... भिशीच्या निमित्ताने एकत्रित आल्याने मौजमजा करायची.. गप्पागोष्टी करायच्या अशी क्रेझ महिलांमध्ये दिसून येते. मात्र, पर्यावरण संवर्धनासाठी तसेच वृक्षलागवडीत महिलांचा अधिक सहभाग वाढावा, यासाठी आपलं पर्यावरण ग्रुपच्या महिलांनी ‘पर्यावरण भिशी’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत दर १५ दिवसांनी एकत्रित वृक्षसंवर्धनासाठी श्रमदान करण्याचा संकल्प या ग्रुपच्या सदस्यांनी केला आहे.

आपलं पर्यावरण ग्रुपच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांतर्गत वृक्षलागवड तसेच वृक्षसंवर्धनातही महिलांनी पुढाकार घ्यावा, महिलांचा सहभाग वाढावा यासाठी ग्रुपच्या सदस्या संध्या जैन, गौरी गायकवाड सुजाता काळे यांनी पुढाकार घेऊन ‘पर्यावरण भिशी’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. महिन्याच्या दर १५ दिवसांनी एकत्र येत महिलांनी देवराई येथे श्रमदानाच्या माध्यमातून वृक्षलागवड करणे, वृक्षांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. प्रारंभी ‘पर्यावरण भिशी’ ग्रुपमध्ये ५० महिला सहभागी झाल्या आहेत. घरातील महिला या उपक्रमात सहभागी झाल्यास घरातील इतर सदस्यांचा या उपक्रमात सहभागही वाढण्यास मदत होते. आगामी काळात या ग्रुपतर्फे शहरभरात वृक्षसंवर्धनासाठी कार्य करण्यात येणार असल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले.
महिलांचासहभाग वाढवा हा उद्देश : वृक्षसंवर्धनाच्याउपक्रमात महिलांचा सहभाग अधिक वाढावा, या उद्देशाने पर्यावरण भिशीची संकल्पना राबवित असल्याचे ग्रुपच्या सदस्या संध्या जैन यांनी सांगितले.
या उपक्रमात महिलांचा सहभाग वाढणार
पर्यावरण भिशी या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी महिलांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर कुटुंबातील इतर सदस्यही या उपक्रमात सहभागी होतील. -शेखर गायकवाड, आपलं पर्यावरण ग्रुप
बातम्या आणखी आहेत...